मुंबई : जागतिक बाजारात असलेल्या संमिश्र संकेताच्या पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्राच्या शेअर्सच्या मागणीने सेन्सेक्स ४० अंकांनी वधारून २५, ८६३.३० वर बंद झाला. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या डेरिव्हेरिव्हज सौद्यांच्या सत्राचा कोणताही परिणाम बाजारावर झाला नाही. पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध धोरण स्वीकारले. टिकाऊ ग्राहकोपयोगी सामान, तंत्रज्ञान, एमएमसीजी, हेल्थकेअर, रियालिटी आणि वाहन शेअर्सची खरेदी वाढल्याने बाजारात स्थिरता होती.३० शेअर्स असलेला सेन्सेक्स प्रारंभी दुर्बल होता; पण नंतर त्यात सुधारणा झाली आणि ४०.५१ अंकांनी वधारून २५,८६३.५० अंकावर तो बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या ‘निफ्टी’त २२.५५ अंकांनी सुधारणा होऊन ७,८६८.५० अंकावर बंद झाला. उद्या ‘बकरी ईद’ असल्याने बाजार बंद राहणार आहे. आज विदेशी पोर्टफोलियोच्या गुंतवणूकदारांनी १३३०.१२ कोटीची विक्री केली. ब्रोकरेज फर्म जियोजित बीएनपी परिबा फायनान्शियलचे विश्लेषक विनोद नायर म्हणाले की, फेडरल बँकेने व्याजदर वाढविले नाहीत, असे असूनही बाजारात चढ-उतार होत राहिले. पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध आहेत. काल अमेरिकी बाजारात घसरण झाली होती.
शेअर बाजारात सावधानता, आयटी शेअर्सची मागणी
By admin | Published: September 25, 2015 12:08 AM