Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार बुडवतो? छे-छे मालामालही करतो!

शेअर बाजार बुडवतो? छे-छे मालामालही करतो!

देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांची गुंतवणूक ७८ टक्क्यांनी वाढली आहे. त्यातून त्यांना तब्बल १२५ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाल्याने ते मालामाल झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 06:08 AM2022-03-26T06:08:07+5:302022-03-26T06:08:24+5:30

देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांची गुंतवणूक ७८ टक्क्यांनी वाढली आहे. त्यातून त्यांना तब्बल १२५ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाल्याने ते मालामाल झाले आहेत.

stock market also does good things gives 125 percent from covid pandemic starts | शेअर बाजार बुडवतो? छे-छे मालामालही करतो!

शेअर बाजार बुडवतो? छे-छे मालामालही करतो!

नवी दिल्ली : देशातील शेअर बाजारातील गुंतवणूक वर्षानुवर्षे वाढत आहे. शेअर बाजारासारख्या धोकादायक मालमत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेने गेल्या काही वर्षांमध्ये मोठी लोकप्रियता मिळविली आहे. देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांची गुंतवणूक ७८ टक्क्यांनी वाढली आहे. त्यातून त्यांना तब्बल १२५ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाल्याने ते मालामाल झाले आहेत.

कोरोनाचा प्रसार वाढत असताना भारतासह जगभरातील देशांत प्रथमच टाळेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे २३ मार्च २०२० ला शेअर बाजारात सर्वांत मोठी घसरण झाली होती. शेअर बाजार १३ टक्के म्हणजे ३ हजार ९३४ अंकांनी घसरून २५,९८१ वर आला होता. शेअर बाजार २०२० च्या निच्चांकी पातळीवर म्हणजे ४० टक्के खाली आला होता. यावेळी कुणीही विचार केला नसेल की काही महिन्यांतच बाजारची वाढ दुप्पट होईल. 
सरकारकडून देण्यात आलेली प्रोत्साहनपर मदत आणि महामारीनंतर सरकारी आणि जागतिक केंद्रीय बँकांनी खासकरून अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने उचललेल्या पावलांमुळे शेअर बाजाराने मोठी भरारी घेतली. 

कोरोना महामारीनंतर बाजाराचे रिटर्न
इंडेक्स    २ वर्ष     कोरोनापासून ते    मार्च-एप्रिल २०२०
        आतापर्यंतची वाढ     मधील घसरण
सेन्सेक्स    १२१.६ टक्के    १४० टक्के    -३८.३ टक्के
निफ्टी ५०    १२६.६ टक्के    १४२.८ टक्के    -३८.४ टक्के
निफ्टी मिडकॅप    १६५.१ टक्के    १९९.२ टक्के     -४० टक्के
निफ्टी स्मॉलकॅप    २०५.७ टक्के    २५८.७ टक्के    -४७ टक्के

या दोन वर्षांत निर्देशांक आणि निफ्टीने १२५ टक्क्यांच्या आसपास रिटर्न दिले आहेत. मात्र, शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत असल्याने गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात काहीशी घसरण झाली आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांनी वाचविले
विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत असल्याने शेअर बाजार अधिक कोसळण्याचा धोका होता. मात्र, बाजाराला किरकोळ गुंतवणूकदारांनी वाचविले आहे. 
सामान्यत: ज्यावेळी मोठे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात विक्री करतात त्यावेळी बाजार कोसळतो. मात्र, यावेळी असे झालेले दिसून येत नाही, त्याचे प्रमुख कारण किरकोळ गुंतवणूकदार आहेत. 
कोरोनानंतर भारतीय नागरिकांची शेअर बाजारातील गुंतवणूक ७८ टक्क्यांनी वाढली आहे.

दोन वर्षांत अशी वाढली गुंतवणूक
डिमॅट    १६७ टक्के
एसआयपी    ६६ टक्के
निफ्टी    १२५ टक्के
मिडकॅप    १६५ टक्के
स्मॉलकॅप    २०० टक्के

Web Title: stock market also does good things gives 125 percent from covid pandemic starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.