Join us  

शेअर बाजार बुडवतो? छे-छे मालामालही करतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 6:08 AM

देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांची गुंतवणूक ७८ टक्क्यांनी वाढली आहे. त्यातून त्यांना तब्बल १२५ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाल्याने ते मालामाल झाले आहेत.

नवी दिल्ली : देशातील शेअर बाजारातील गुंतवणूक वर्षानुवर्षे वाढत आहे. शेअर बाजारासारख्या धोकादायक मालमत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेने गेल्या काही वर्षांमध्ये मोठी लोकप्रियता मिळविली आहे. देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांची गुंतवणूक ७८ टक्क्यांनी वाढली आहे. त्यातून त्यांना तब्बल १२५ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाल्याने ते मालामाल झाले आहेत.कोरोनाचा प्रसार वाढत असताना भारतासह जगभरातील देशांत प्रथमच टाळेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे २३ मार्च २०२० ला शेअर बाजारात सर्वांत मोठी घसरण झाली होती. शेअर बाजार १३ टक्के म्हणजे ३ हजार ९३४ अंकांनी घसरून २५,९८१ वर आला होता. शेअर बाजार २०२० च्या निच्चांकी पातळीवर म्हणजे ४० टक्के खाली आला होता. यावेळी कुणीही विचार केला नसेल की काही महिन्यांतच बाजारची वाढ दुप्पट होईल. सरकारकडून देण्यात आलेली प्रोत्साहनपर मदत आणि महामारीनंतर सरकारी आणि जागतिक केंद्रीय बँकांनी खासकरून अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने उचललेल्या पावलांमुळे शेअर बाजाराने मोठी भरारी घेतली. कोरोना महामारीनंतर बाजाराचे रिटर्नइंडेक्स    २ वर्ष     कोरोनापासून ते    मार्च-एप्रिल २०२०        आतापर्यंतची वाढ     मधील घसरणसेन्सेक्स    १२१.६ टक्के    १४० टक्के    -३८.३ टक्केनिफ्टी ५०    १२६.६ टक्के    १४२.८ टक्के    -३८.४ टक्केनिफ्टी मिडकॅप    १६५.१ टक्के    १९९.२ टक्के     -४० टक्केनिफ्टी स्मॉलकॅप    २०५.७ टक्के    २५८.७ टक्के    -४७ टक्केया दोन वर्षांत निर्देशांक आणि निफ्टीने १२५ टक्क्यांच्या आसपास रिटर्न दिले आहेत. मात्र, शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत असल्याने गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात काहीशी घसरण झाली आहे.किरकोळ गुंतवणूकदारांनी वाचविलेविदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत असल्याने शेअर बाजार अधिक कोसळण्याचा धोका होता. मात्र, बाजाराला किरकोळ गुंतवणूकदारांनी वाचविले आहे. सामान्यत: ज्यावेळी मोठे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात विक्री करतात त्यावेळी बाजार कोसळतो. मात्र, यावेळी असे झालेले दिसून येत नाही, त्याचे प्रमुख कारण किरकोळ गुंतवणूकदार आहेत. कोरोनानंतर भारतीय नागरिकांची शेअर बाजारातील गुंतवणूक ७८ टक्क्यांनी वाढली आहे.दोन वर्षांत अशी वाढली गुंतवणूकडिमॅट    १६७ टक्केएसआयपी    ६६ टक्केनिफ्टी    १२५ टक्केमिडकॅप    १६५ टक्केस्मॉलकॅप    २०० टक्के

टॅग्स :शेअर बाजार