Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 400 अंकांनी वाढून 72500 वर, तर निफ्टी 22 हजारांच्या पुढे

शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 400 अंकांनी वाढून 72500 वर, तर निफ्टी 22 हजारांच्या पुढे

Stock Market Opening: शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 06:34 PM2024-03-21T18:34:33+5:302024-03-21T18:34:50+5:30

Stock Market Opening: शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळाली.

Stock Market: Boom in the stock market; Sensex up 400 points to 72500, Nifty over 22 thousand | शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 400 अंकांनी वाढून 72500 वर, तर निफ्टी 22 हजारांच्या पुढे

शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 400 अंकांनी वाढून 72500 वर, तर निफ्टी 22 हजारांच्या पुढे

Stock Market Opening: शेअर बाजारात आज(दि.21) तेजी पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच निफ्टीने 22,000 चा टप्पा पार केला, तर सेन्सेक्सने 560 अंकांची उसळी घेतली. आज BSE सेन्सेक्स 405.67 अंकांच्या किंवा 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 72,507 वर उघडला, तर NSE चा निफ्टी 150.80 अंकांच्या किंवा 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 21,989 वर उघडला.

सुरुवातीच्या काही मिनिटांत NSE निफ्टी 165.00 अंकांनी किंवा 0.76 टक्क्यांनी वाढून 22,004 वर पोहोचला, तर BSE सेन्सेक्स 575.38 अंकांनी किंवा 0.80 टक्क्यांनी वाढून 72,677 च्या पातळीवर पोहोचला. अमेरिकन बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेताचा देशांतर्गत बाजारावर परिणाम झाला. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल न केल्याने आज सोनेही विक्रमी पातळीवर उघडले. सुरुवातीच्या काही मिनिटांतच सोन्याच्या भावात 1000 रुपयांची उसळी पाहायला मिळत आहे. 

BSE चे मार्केट कॅपिटलायझेशन
आज बीएसईचे मार्केट कॅप 378.05 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सेन्सेक्समधील टॉप 30 शेअर्सपैकी 28 शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते, तर 2 शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. निफ्टीमधील 50 पैकी 43 शेअर्स वाढले, तर केवळ 7 शेअर घसरणीवर व्यवहार करत होते. 

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Stock Market: Boom in the stock market; Sensex up 400 points to 72500, Nifty over 22 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.