Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात तेजी; निर्देशांकात वाढ

शेअर बाजारात तेजी; निर्देशांकात वाढ

परकीय वित्तसंस्थांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजाराचा संवेदनशिल निर्देशांक ४७८ अंशांनी वाढला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:32 AM2020-08-19T02:32:36+5:302020-08-19T02:32:41+5:30

परकीय वित्तसंस्थांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजाराचा संवेदनशिल निर्देशांक ४७८ अंशांनी वाढला.

Stock market boom; Increase in the index | शेअर बाजारात तेजी; निर्देशांकात वाढ

शेअर बाजारात तेजी; निर्देशांकात वाढ

मुंबई : जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले सकारात्मक वातावरण तसेच परकीय वित्तसंस्थांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजाराचा संवेदनशिल निर्देशांक ४७८ अंशांनी वाढला.
सकाळपासून तेजीचे वातावरण होते. संवेदनशिल निर्देशांक सुमारे २०० अंश वर जाऊन खुला झाला. दिवसअखेरीस तो ३८५२८.३२ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ४७७.५४ अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक १.२३ टक्के म्हणजेच १३८.२५ अंशांनी वाढून ११३८५.३५ अंशांवर बंद झाला.

Web Title: Stock market boom; Increase in the index

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.