Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर, गुंतवणूकदार सुखावले

शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर, गुंतवणूकदार सुखावले

आजच्या सत्रात लार्जकॅप, आयटी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 04:11 PM2024-07-12T16:11:37+5:302024-07-12T16:14:44+5:30

आजच्या सत्रात लार्जकॅप, आयटी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

stock market boom; Sensex-Nifty at all-time high again, investors happy | शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर, गुंतवणूकदार सुखावले

शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर, गुंतवणूकदार सुखावले

Stock Market Closing 12th July 2024 : शेअर बाजारासाठी शुक्रवारचा(दि.9) दिवस अत्यंत शुभ ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टीने आजही सर्वकालीन उच्चांक गाठला. आज Sensex ने 80893 चा सार्वकालिक उच्चांक गाठला, तर NIFTI देखील 24592 च्या नवीन उच्चांकावर पोहचले. आजच्या व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 622 अंकांच्या वाढीसह 80519 च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 196 अंकांच्या वाढीसह 24512 च्या पातळीवर बंद झाला.

आजच्या सत्रात आयटी क्षेत्रात जोरदार खरेदी झाली, ज्यामुळे लार्जकॅप आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. निफ्टी 50 निर्देशांकात टीसीएस (6.64 %), विप्रो (4.88 %), इन्फोसिस (3.58 %), एचसीएल टेक (3.20 %), टेक महिंद्रा (3 %) आणि LTI Mindtree (3 %) मुळे जोरदार वाढ झाली. तर, मारुती सुझुकी, डिव्हिस लॅब, एशियन पेंट्स आणि टायटनचे सर्वाधिक नुकसान झाले. निफ्टी 50 चे पहिले सहा टॉप गेनर्स आयटी शेअर्स आहेत. 

आजचा सत्रात एफएमसीजी, मीडिया, एनर्जी, आरोग्यसेवा, ऑईल & गॅस क्षेत्राचे शेअर्स वाढले, तर कंझ्युमर ड्युरेबल्स, मेटल, रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईल शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आजही तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 20 वाढीसह आणि 10 घसरणीसह बंद झाले. 

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: stock market boom; Sensex-Nifty at all-time high again, investors happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.