Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market : १० महिन्यांत शेअरची १०२ रुपयांवरून ९३०० रूपयांवर झेप; 'या' शेअरनं दिलं गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न

Stock Market : १० महिन्यांत शेअरची १०२ रुपयांवरून ९३०० रूपयांवर झेप; 'या' शेअरनं दिलं गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न

Stock Market EKI Energy Services: १० महिन्यांमध्ये गुंतवणूकदार झाले मालामाल; १ लाखांचे झाले ६६ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 05:45 PM2022-02-14T17:45:36+5:302022-02-14T17:46:03+5:30

Stock Market EKI Energy Services: १० महिन्यांमध्ये गुंतवणूकदार झाले मालामाल; १ लाखांचे झाले ६६ लाख

stock market bse nse eki energy services delivered more than 6500 percent returns in 10 months 102 rs share jumps on 9300 rs know details | Stock Market : १० महिन्यांत शेअरची १०२ रुपयांवरून ९३०० रूपयांवर झेप; 'या' शेअरनं दिलं गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न

Stock Market : १० महिन्यांत शेअरची १०२ रुपयांवरून ९३०० रूपयांवर झेप; 'या' शेअरनं दिलं गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न

गेल्या वर्षी अनेक कंपन्यांचे आयपीओ (IPO) आले होते. परंतु यादरम्यान आलेल्या एका आयपीओनं गुंतवणूकदारांची जबरदस्त चांदी केली आहे. या कंपनीनं केवळ १० महिन्यांच्याच कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस (EKI Energy Services) असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीच्या शेअरनं १० महिन्यांत ग्राहकांना तब्बल ६५०० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत. आयपीओदरम्यान १०२ रूपयांवर हे शेअर्स अलॉट करण्यात आले होते. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस कार्बन क्रेडिट डेव्हलपर आणि सप्लायर आहे.

ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर ७ एप्रिल २०२१ रोजी बीएसई (BSE) वर १४७ रुपयांच्या जवळ होते. परंतु १४ फेब्रुवारी २०२२ रोजी या कंपनीचे शेअर्स ९३०० रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या या शेअरनं १० महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांना जबरदस्त रिटर्न दिले आहेत. जर कोणत्याही व्यक्तीनं ७ एप्रिल २०२१ रोजी यामध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची किंमत आज जवळपास ६६ लाखांपर्यंत पोहोचली आहे.

सहा महिन्यांत ५०० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्सनं गेल्या ६ महिन्यांमध्ये ५०० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिले आहे. कंपनीचा हा शेअर १६ ऑगस्ट रोजी १५६७.०५ रूपयांवर होता. तोच शेअर आता ९३०० रूपयांवर पोहोचला आहे. जर कोणत्याही व्यक्तीनं १६ ऑगस्ट २०२१ रोदी कंपनीमध्ये १ लाख रूपये गुंतवले असतील तर त्याची किंमत आज ६.१८ लाख रूपये इतकी झाली आहे. 

१२५९९ रुपयांचा ऑल टाईम हाय
कंपनीचा शेअर १२५९९.९५ रुपयांच्या किंमतीवर ५२ आठवड्यांच्या ऑल टाईम हायवर पोहोचला होता. तर याचे ऑल टाईम लो १४० रूपये होती. कंपनीचं मार्केट कॅप ६५५४ कोटी रूपयांच्या जवळपास आहे. डिसेंबर २०२१ तिमाहित कंपनीचा महसूल ६८७.८२ कोटी रूपये होता आणि कंपनीला १६१.२१ कोटी रुपयांचं नेट प्रॉफिट झालं होतं.

Web Title: stock market bse nse eki energy services delivered more than 6500 percent returns in 10 months 102 rs share jumps on 9300 rs know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.