- पुष्कर कुलकर्णी
गेले दोन आठवडे भारतीय शेअर बाजार किती अस्थिर होते ते सर्वांनी अनुभवले. निफ्टी आणि सेन्सेक्स मधील चढ उतार आणि त्यातील अस्थिरता गुंतवणूकदारांचे मनही अस्थिर करीत असते. काही गुंतवणूकदार अडकून आहेत. काहींना नव्याने बाजारात प्रवेश करण्याची संधी मिळाली. काहींनी राखीव पैसे वापरून सरासरी भाव कमी करण्याचा प्रयत्न केला. बाजार खाली येतानाच अनेक दिग्गज कंपन्यांचे भाव कोसळले आणि दैनंदिन व्यवहारात त्यांच्या भावात अत्यंत मोठे चढ उतार अनुभवायास मिळाले. आणि त्यामुळेच आता गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
कोणते मुद्दे नेमके लक्षात घ्यावेत?
nबाजार फक्त एकतर्फी चाल चालत नसतो
nबाजारातील अस्थिरता मनाची स्थिरता कमी करते. त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता अधिक असते.
nट्रेडर्सला बाजाराचा मोठया प्रमाणावरील चढ उतार आर्थिक फटका देऊन जाऊ शकतो.
nबहुतांश वेळेस फंडामेंटल आणि
टेक्निकलला फाटा देत शेअर बाजार
आपली उलटी चाल गुंतवणूकदारांना दाखवीत असतो.
nबाजार म्हणजे झटपट पैसा असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी अनपेक्षित चढ - उतार ही एक मोठी शिकवण आहे.
नेमके काय कराल?
पॅनिक सेल काळ म्हणजेच मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यास ती खरेदीसाठी उत्तम संधी समजावी.
बाजारात संयम हा अत्यंत महत्वाचा घटक असतो आणि त्याचे रिटर्न्स चांगले असतात. त्यामुळे संयम राखा. ट्रेडर कमी इन्व्हेस्टर अधिक रहा.
ट्रेडिंग करताना बाजारातील अस्थिरता फायदा तसेच तोटा देणार आणि तोटा सहन करण्याची ताकद असल्यासच इंट्रा डे किव्वा ऑप्शन्स ट्रेड साठी विचार करा.
मन चंचल न करता जितके स्थिर करता येईल
तितके चांगले. जसे विक्रीसाठी गुंतवणूकदार पुढे येतात तसेच खरेदीसाठीही तयार असतात हे सूत्र कायम लक्षात ठेवा.
कोसळताना बाजारातील अस्थिरता जितकी अधिक तितचीक भविष्यातील स्थिरताही अधिक यावर विश्वास ठेवा.