Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा

शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा

Cyber Crime : नोएडामध्ये काही सायबर गुन्हेगारांनी कंपनी ऑपरेटरची साडेसात कोटी रुपयांची फसवणूक केली. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांना लुटण्यात आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:58 PM2024-11-29T12:58:07+5:302024-11-29T12:59:09+5:30

Cyber Crime : नोएडामध्ये काही सायबर गुन्हेगारांनी कंपनी ऑपरेटरची साडेसात कोटी रुपयांची फसवणूक केली. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांना लुटण्यात आलं आहे.

stock market cheating case noida based company operator loses rs 7 5 crore | शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा

शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा

Cyber Crime : सायबर गुन्ह्यांची आकडेवारी दहशत निर्माण करणारी आहे. गेल्या ९ महिन्यात ११ हजार ३०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. धक्कादायक म्हणजे रिकव्हरी रेट फक्त १ टक्क्याच्या आसपास आहे. म्हणजे १०० पैकी फक्त एकाला त्याचे पैसे परत मिळाले आहेत. ऑनलाइन गुन्हे करणारे सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी रोज नवनवीन फंडे वापरत आहेत. सध्या त्यांच्या टार्गेटवर शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहेत. उत्तर प्रदेशातील औद्योगिक शहर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

शेअर बाजारातून बक्कळ पैसा कमवण्याचे आमिष दाखवून सायबर घोटाळेबाजांनी कंपनी ऑपरेटरची ७.६६ कोटी रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. नोएडातील सेक्टर-७७ येथील अंत्रिक्ष फॉरेस्ट सोसायटीमध्ये राहणारे सृजन धारिया यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली. सायबर गुन्हेगारांनी तक्रारदार यांचे वडील दीपचंद यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. शेअर मार्केटमधून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. 

कशी झाली फसवणूक?
आरोपींच्या बोलण्याने प्रभावित झालेल्या दीपचंद यांनी 'फ्रँकलिन टेम्पलटन असेंट मॅनेजमेंट कंपनी' नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये त्यांना जोडण्यात आले. काही दिवसांनंतर प्रिया शर्मा नावाच्या महिलेने दीपचंद यांना फोन करुन ग्रुपची सविस्तर माहिती दिली. या ग्रुपमध्ये आणखी ७३ लोक उपस्थित होते. "ग्रुपमधील काही नंबरवर पोलिसांचा गणवेश घातलेल्या लोकांचे 'डीपी' (व्हॉट्सॲप प्रोफाइल पिक्चर) दिसत होते.", असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. हे पाहून दिपचंद यांचा आणखी विश्वास बसला. यातूनच त्यांनी थोडेथोडी करुन तब्बल ७.६६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यांचा समूहातील नफा दुप्पट असल्याचे दर्शविले गेले. नंतर आरोपीने फोन करून फी म्हणून ३ कोटी रुपये जमा करण्यास सांगितले.

दीपचंद यांनी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) याची चौकशी केली असता ही माहिती खोटी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपण फसवणुकीला बळी पडल्याचे लक्षात येताच दीपचंद यांनी गृह मंत्रालयाच्या पोर्टलवर तक्रार केली आहे. तर सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: stock market cheating case noida based company operator loses rs 7 5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.