Lokmat Money > बिझनेस न्यूज > किरकोळ वाढीसह शेअर मार्केट बंद; टाटा स्टील, बजाज ऑटोसह 'या' कंपन्या ठरल्या टॉप गेनर...

किरकोळ वाढीसह शेअर मार्केट बंद; टाटा स्टील, बजाज ऑटोसह 'या' कंपन्या ठरल्या टॉप गेनर...

आज सुमारे 2071 शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली, तर 1588 शेअर्स घसरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 05:03 PM2024-03-07T17:03:49+5:302024-03-07T17:04:05+5:30

आज सुमारे 2071 शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली, तर 1588 शेअर्स घसरले.

Stock market closes with minor gains; These companies along with Tata Steel, Bajaj Auto became the top gainers... | किरकोळ वाढीसह शेअर मार्केट बंद; टाटा स्टील, बजाज ऑटोसह 'या' कंपन्या ठरल्या टॉप गेनर...

किरकोळ वाढीसह शेअर मार्केट बंद; टाटा स्टील, बजाज ऑटोसह 'या' कंपन्या ठरल्या टॉप गेनर...

Share Market News: शेअर बाजाराच्यागुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस(7 मार्च) सामान्य राहिला. दिवसाच्या सुरुवातीला विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर दोन्ही निर्देशांक एका फ्लॅट नोटवर बंद झाले. Sensex 33.40 अंकांच्या किंवा 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 74,119.39 वर बंद झाला, NIFTI 19.50 अंकांच्या किंवा 0.09 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 22,493.50 वर बंद झाला. आज सुमारे 2071 शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली, तर 1588 शेअर्स किरकोळ घसरले. 

टाटा स्टील, बजाज ऑटो, टाटा कंझ्युमर, टाटा मोटर्स आणि जेएसडब्ल्यू स्टील हे निफ्टीमधील टॉप गेनर ठरले, तर M&M, BPCL, Reliance Industries, Axis Bank आणि ICICI यांना फटका बसला. वेगवेगळ्या क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, बँक, ऑइल अँड गॅस, ऑटो, रियल्टी लाल रंगात बंद झाले. तर मेटल, भांडवली वस्तू, मीडिया आणि FMCG 1-2.5 टक्क्यांनी वाढले. BSE मिडकॅप इंडेक्स 0.3 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.7 टक्क्यांनी वाढला. 

महाशिवरात्रीदिनी बाजार बंद राहणार
उद्या महाशिवरात्री आहे, त्यामुळे शेअर बाजार बंद राहणार आहे. शुक्रवारी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. शनिवार आणि रविवारमुळे शेअर बाजार आता 11 मार्चला सुरू होतील. 

Web Title: Stock market closes with minor gains; These companies along with Tata Steel, Bajaj Auto became the top gainers...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.