Stock Market Closing : भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस वाईट ठरला असून निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स, मिडकॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झालेल्या ३ टक्क्यांच्या घसरणीनं बाजाराला खाली खेचण्यात मोठी भूमिका बजावली आणि बाजाराला सपोर्ट मिळू शकला नाही. रियल्टी, फार्मा, ऑइल अँड गॅस शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत घसरण दिसून आली. ऑटो, मेटल, फार्मा निर्देशांकातील घसरणीचाही बाजारावर परिणाम झाला.
बीएसई सेन्सेक्स ९४२ अंकांच्या घसरणीसह ७८,७८२.२४ वर बंद झाला. याशिवाय राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०९ अंकांच्या घसरणीसह २३,९९५.३५ वर बंद झाला.
मोठी घसरण का झाली?
बाजारात किंचित सुधारणा झाल्यानंतर निफ्टी जवळपास १७५ अंकांनी स्थिर होता, पण त्यानंतर निफ्टी ३०० अंकांनी घसरून बंद झाला. ऑटो शेअर्समधील जोरदार विक्रीतून बाजार सावरू शकला नाही आणि मेटल शेअर्समध्ये वेदांता, हिंडाल्को आणि जिंदाल स्टील सारखे शेअर्स मोठ्या घसरणीसह बंद झाले. बँक निफ्टीमध्ये ४५८ अंकांची मोठी घसरण होऊन तो ५१२१५ च्या पातळीवर पोहोचला.
सेन्सेक्स-निफ्टी शेअर्सची स्थिती
सेन्सेक्सच्या ३० पैकी २४ समभाग शेअर्स घसरणीसह बंद झाले, तर ६ शेअर्समध्ये तेजी दिसून आली. याशिवाय निफ्टीतील ५० पैकी ४२ शेअर्स घसरले आणि केवळ ८ शेअर्स तेजीसह बंद झाले.
बीएसईच्या मार्केट कॅपवर नजर टाकली तर मुंबई शेअर बाजारातील व्यवहार ४४२.०२ लाख कोटी रुपयांसह बंद झाले असून ४१९९ शेअर्सपैकी २७१३ शेअर्स बंद झाले आहेत. कामकाजादरमयान १३५४ शेअर्स वधारले आणि १३२ शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार बंद झाले.