Join us

सेन्सेक्स 270 तर निफ्टी 66 अंकांनी कोसळले, गुंतवणूकदारांनी 1.39 लाख कोटी रुपये गमावले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 4:28 PM

Stock Market LIVE: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (21 जून) शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग दिसून आली.

Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (21 जून) शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग दिसून आली. आठवडाभरात उच्चांकावर पोहोचलेला बाजार आज लक्षणीयरीत्या खाली आला. बीएसई सेन्सेक्स 270 अंकांनी घसरुन 77,209 वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी 66 अंकांनी घसरुन 23,501 अंकांवर बंद झाला. आजच्या सत्रात एफएमसीजी आणि एनर्जी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. बाजाराला केवळ आयटी शेअर्सचा आधार मिळाला. 

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 10 वाढीसह आणि 20 तोट्यासह बंद झाले. BSE वर एकूण 3987 शेअर्समध्ये व्यवहार झाले, ज्यामध्ये 1785 वाढीसह, तर 2086 तोट्यासह बंद झाले.

मार्केट कॅपमध्ये घसरणबाजारातील विक्रीमुळे बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप घसरुन 434.36 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 435.75 लाख कोटी होते. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 1.39 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्सआजच्या व्यवहारात भारती एअरटेल 2.32 टक्के, इन्फोसिस 1.08 टक्के, टीसीएस 0.59 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.54 टक्के, एनटीपीसी 0.55 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.48 टक्के, विप्रो 0.01 टक्के वाढीसह बंद झाले. तर, अल्ट्राटेक सिमेंट 2.22 टक्के, एलअँडटी 1.78 टक्के, टाटा मोटर्स 1.74 टक्के, नेस्ले 1.71 टक्के, एचयूएल 1.63 टक्के, टाटा स्टील 1.37 टक्के घसरुन बंद झाले.

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक