गेल्या तीन दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये घसरण सुरू आहे. काल गुरुवारी मार्केट सावरले होत, पण आज पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये घसरण झाली आहे. आजच्या घसरणीत गुंतवणूकदारांचे एक लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. जागतिक स्तरावर संमिश्र ट्रेंड आणि हेवीवेट स्टॉक एचडीएफसी बँकेत चढ-उतार यामुळे आज बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० या इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांमध्ये बरीच अस्थिरता होती. ते दिवसभर ग्रीन आणि रेड झोनमध्ये फिरत राहिले आणि ट्रेडिंगच्या शेवटी रेड झोनमध्ये बंद झाला आहे.
आज सेन्सेक्स २५९.५८ अंकांच्या घसरणीसह ७१४२३.६५ वर बंद झाला आणि निफ्टी५०.६० अंकांच्या घसरणीसह २१५७१.८० वर बंद झाला. निफ्टीच्या सर्व क्षेत्र निर्देशांकांमध्ये संमिश्र कल होता. निफ्टी बँक आज ०.८९ टक्क्यांनी मजबूत झाली आहे. निफ्टी एफएमसीजी आज १.१८ टक्क्यांनी घसरून बंद झाला.
Passport साठी तुम्ही अर्ज केला का? दिवसाला पाच हजार जणांची नोंद; ऑनलाइनमुळे सहज शक्य
शेअर मार्केटमधील घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. १९ जानेवारी २०२४ रोजी BSE वर लिस्टेड सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप ३७५.५८ लाख कोटी रुपये होते. आज २० जानेवारी २०२४ रोजी तो ३७४.६३ लाख कोटी रुपयांवर घसरला आहे. आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात १.०५ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. याआधी तीन दिवसांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात ६.६ लाख कोटी रुपयांची घट झाली होती, पण त्यानंतर गुरुवारी १९ जानेवारीला ४.०८ लाख कोटी रुपयांची वसुली झाली.आज पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे, आज १ लाख कोटी रुपयांनी घट झाली.