Join us

एक्झिट पोलपूर्वी शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी एका दिवसात कमावले ₹ 2.19 लाख कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 4:41 PM

Stock Market Closing: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी बाजारात तेजी आल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला आहे.

Stock Market Closing : येत्या 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. याच्या एक दिवस आधी, म्हणजेच 31 मे रोजी शेअर बाजारने चांगला वेग पकडला. सेन्सेक्स 74,000 वर बंद झाला, तर निफ्टी 22,600 वर आला. शुक्रवारी बाजारात दिसलेली ही वाढ अतिशय चांगली आहे, कारण उद्याच सायंकाळी एक्झीट पोल जाहीर होतील आणि त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर पडेल. त्यामुळेच सोमवार शेअर बाजारासाठी अत्यंत महत्वचा असणार आहे.

गेल्या अनेक दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला. निफ्टी 42 अंकांनी वाढून 22,530 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 75 अंकांनी वाढून 73,961 वर आला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे 2.19 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. BSE मिडकॅप निर्देशांक 0.06 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.76 टक्क्यांनी वाढला. 

सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे शेअर्सबीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.01 टक्के वाढ झाली आहे. यानंतर बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स 0.96% ते 1.84% पर्यंत वाढले.

सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 शेअर्ससेन्सेक्समधील उर्वरित 13 समभाग आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही नेस्ले इंडियाचे शेअर्स 2.06 टक्क्यांनी घसरले. याशिवाय मारुती सुझुकी इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एशियन पेंट्सचे शेअर्स अनुक्रमे 0.76% ते 1.51% घसरून लाल रंगात बंद झाले.

(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक