Join us

Stock Market : शेअर मार्केट क्रॅश; सेन्सेक्स 900 तर निफ्टी 300 अंकांनी घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 4:18 PM

आजच्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 4.41 लाख कोटी रुपयांचा फटका.

Share Market : शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी शुक्रवारचा दिवस (2 ऑगस्ट) अत्यंत वाईट ठरला. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात(2 ऑगस्ट) खराब जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला. बाजार बंद झाल्यानंतर बीएसई Sensex 886 ने घसरुन 80,982 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा Nifti 311 अंकांच्या घसरणीसह 24,699.50 अंकांवर बंद झाला.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्सआजच्या सत्रात Zomato च्या स्टॉकने उत्कृष्ट कामगिरी केली. हा शे्र 12.07 टक्क्यांच्या वाढीसह 262.34 रुपयांवर बंद झाला. याशिवाय इन्फो एज 4.85 टक्के, आयईएक्स 2.57 टक्के, इंडिया सिमेंट 2.41 टक्के, पेज इंडस्ट्रीज 1.78 टक्के, दिवीज लॅब 1.49 टक्के, पिरामल एंटरप्रायझेस 1.42 टक्के, एचडीएफसी बँक 1.24 टक्के, महानगर गॅस 1.19 टक्के, सन फार्मा 1.19 टक्के वाढीसह बंद झाले. तर, कमिन्स 7.97 टक्के, एस्कॉर्ट्स कुबोटा 5.90 टक्के, बिर्लासॉफ्ट 5.86 टक्के, आयशर मोटर्स 4.87 टक्के, मारुती सुझुकी 4.74 टक्के, टाटा मोटर्स 4.71 टक्के, यूपीएल 4.08 टक्के, ट्रेंट 4.30 टक्क्यांनी घसरले.

सेक्टोरिअल अपडेटआजच्या व्यवहारात सर्वात मोठी घसरण आयटी शेअर्समध्ये दिसून आली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 2.41 टक्क्यांनी किंवा 980 अंकांनी घसरला. याशिवाय ऑटो, एफएनसीजी, मेटल, एनर्जी, रिअल इस्टेट, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल आणि गॅस सेक्टरचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. फक्त फार्मा आणि हेल्थकेअर समभागात तेजी राहिली. बीएसईवर 4033 शेअर्समध्ये व्यवहार झाले, ज्यात 1713 वाढीसह झाले तर 2205 तोट्यासह बंद झाले.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान शेअर बाजारातील विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 457.21 लाख कोटी रुपयांवर आले, जे गेल्या सत्रात 461.62 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 4.41 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक