Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; सेंसेक्स 600 अन् निफ्टी 216 अंकांनी कोसळले...

शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; सेंसेक्स 600 अन् निफ्टी 216 अंकांनी कोसळले...

Stock Market Closing: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार घसरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 05:38 PM2024-05-30T17:38:04+5:302024-05-30T17:38:45+5:30

Stock Market Closing: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार घसरला.

Stock Market Closing: Stock market disappointed again; Sensex 600 and Nifty fall by 216 points | शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; सेंसेक्स 600 अन् निफ्टी 216 अंकांनी कोसळले...

शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; सेंसेक्स 600 अन् निफ्टी 216 अंकांनी कोसळले...

Stock Market Closing: गेल्या पाच दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरुच आहे. BSE सेन्सेक्स 617.30 अंकांच्या किंवा 0.83 टक्क्यांच्या घसरणीसह 73,885 च्या पातळीवर बंद झाला, तर NSE चा निफ्टी 216 अंकांच्या किंवा 0.95 टक्क्यांच्या घसरणीसह 22,488 वर बंद झाला. आजच्या व्यवहारात बँक आणि मीडिया शेअर्स व्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. 

BSE चे बाजार भांडवल घटले
आजच्या घसरणीमुळे बीएसईचे बाजार भांडवल 411.21 लाख कोटी रुपयांवर आले. विशेष म्हणजे, या आठवड्यातच याने 421 लाख कोटींचा आकडा गाठला होता. म्हणजेच, अवघ्या एका आठवड्याच्या आतच त्यात 10 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. आज बीएसईवर 3917 शेअर्सचे व्यवहार झाले, त्यापैकी 1213 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर 2597 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 

सर्वाधिक वाढणारे आणि घटणारे शेअर्स
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 7 शेअर वाढले, तर 23 शेअर घटले. ICICI बँकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक 1.14 टक्क्यांची वाढ झाली, त्यापाठोपाठ ॲक्सिस बँकेचा शेअर 1 टक्क्यांनी वाढला. यानंतर एचडीएफसी बँक, एसबीआय, एल अँड टी, कोटक महिंद्रा बँक आणि भारती एअरटेलच्या शेअर्सचे हिरव्या रंगात बंद झाले. तर, टाटा स्टील सर्वाधिक 5.74 टक्क्यांनी आणि टायटन 3.17 टक्क्यांनी घसरला. यापाठोपाठ टेक महिंद्रा 3.15 टक्क्यांनी आणि विप्रो 3.09 टक्क्यांनी घसरुन बंद झाले. बजाज फिनसर्व्हदेखील 2.91 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

निफ्टीच्या 10 समभागांमध्ये तेजी 
ट्रेडिंग बंद होण्याच्या वेळी निफ्टीचे 50 पैकी फक्त 10 शेअर्स वाढले, तर 40 शेअर्स घसरले. यातही आयसीआयसी बँकेचा सर्वाधिक फायदा झाला तर टाटा स्टीलला सर्वाधिक नुकसान झाले. 

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: Stock Market Closing: Stock market disappointed again; Sensex 600 and Nifty fall by 216 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.