Join us

शेअर बाजार घसरला, सेन्सेक्स 600 तर निफ्टी 180 अंकांनी खाली आले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 4:05 PM

Stock Market LIVE: आजच्या सत्रात आयटी आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली.

Stock Market LIVE :शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांना आज(दि.8) फटका बसला. सेन्सेक्स 582 अंकांनी घसरुन 78,886 वर बंद झाला, तर निफ्टी 180 अंकांच्या घसरणीसह 24,117 वर बंद झाला. आजच्या सत्रात सर्वात मोठी घसरण आयटी आणि मेटल शेअर्समध्ये दिसून आली. इन्फोसिस, एलटीआय माइंडट्री, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टीलच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्सआजच्या सत्रात MRF 4.30 टक्के, Alchem ​​Lab 3.17 टक्के, ट्रेंट 3.14 टक्के, भारत फोर्ज 3.08 टक्के, Lupin 2.83 टक्के, Max Financial 2.08 टक्के, HDFC Life 2.03 टक्के, ICIMB 2.03 टक्के. 1.81 टक्के आणि जीएमआर विमानतळ 1.76 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर, पिरामन एंटरप्रायझेस 4.31 टक्के, LTIMindtree 4.12 टक्के, श्री सिमेंट 3.81 टक्के, नोल्को 3.72 टक्के, ग्रासिम 3.50 टक्के, गोदरेज प्रॉपर्टीज 3.40 टक्के, सेल 2.95 टक्के, बर्जर पेंट्स 2.9 टक्के घसरले.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक