Lokmat Money > बिझनेस न्यूज > रुपयाच्या अवमूल्यनामुळे शेअर बाजार गडगडला

रुपयाच्या अवमूल्यनामुळे शेअर बाजार गडगडला

अमेरिका व चीनमधील व्यापारी संबंधाबद्दल अनिश्चितता, रुपयाचे अवमूल्यन आणि आगामी निवडणुकांचे निकाल याचे पडसाद गुरुवारी शेअर बाजारावर उमटले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:39 AM2018-12-07T04:39:27+5:302018-12-07T04:39:33+5:30

अमेरिका व चीनमधील व्यापारी संबंधाबद्दल अनिश्चितता, रुपयाचे अवमूल्यन आणि आगामी निवडणुकांचे निकाल याचे पडसाद गुरुवारी शेअर बाजारावर उमटले.

Stock market collapses due to rupee depreciation | रुपयाच्या अवमूल्यनामुळे शेअर बाजार गडगडला

रुपयाच्या अवमूल्यनामुळे शेअर बाजार गडगडला

मुंबई : अमेरिका व चीनमधील व्यापारी संबंधाबद्दल अनिश्चितता, रुपयाचे अवमूल्यन आणि आगामी निवडणुकांचे निकाल याचे पडसाद गुरुवारी शेअर बाजारावर उमटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५७२ अंकांनी गडगडला. निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल २.२८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बाजारात सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स ५७२.२८ अंकांनी घसरून ३५,३१२.१३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८१.७५ अंकांनी घसरून १०,६०१.१५ अंकांवर बंद झाला. बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्सच्या दरात सर्वाधिक घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील मारुती, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, येस बँक,
अदाणी पोर्ट्स, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, ओएनजीसी, एचयूएल, कोटक बँक, इंडसइंड बँक आणि अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग घसरले.

Web Title: Stock market collapses due to rupee depreciation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.