Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार क्रॅश... पाकिस्तानला सहनच करता आला नाही, ट्रेडिंगच रोखून वाचण्याचे प्रयत्न

शेअर बाजार क्रॅश... पाकिस्तानला सहनच करता आला नाही, ट्रेडिंगच रोखून वाचण्याचे प्रयत्न

सोमवारी जगभरातील शेअर मार्केमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:48 IST2025-04-07T19:40:38+5:302025-04-07T19:48:15+5:30

सोमवारी जगभरातील शेअर मार्केमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

Stock market crash news US tariffs hit Pakistan stock market hard, market falls | शेअर बाजार क्रॅश... पाकिस्तानला सहनच करता आला नाही, ट्रेडिंगच रोखून वाचण्याचे प्रयत्न

शेअर बाजार क्रॅश... पाकिस्तानला सहनच करता आला नाही, ट्रेडिंगच रोखून वाचण्याचे प्रयत्न

अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर त्यांनी अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. काही दिवसापूर्वीच त्यांनी टॅरिफबाबतचा निर्णय घेतला. अमेरिकन टॅरिफचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. शेअर मार्केटमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.  याचा पाकिस्तानशेअर बाजारला बसला.  कराची स्टॉक एक्सचेंज ६% किंवा ७,२०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. यामुळे निर्देशांकातील व्यवहार थांबले. जगभरातील विक्रीमुळे, बाजार ४५ मिनिटांसाठी थांबवावा लागला. यानंतर बाजार थोडासा सावरला. जागतिक मंदीच्या भीतीमुळे ही घसरण झाल्याचे विश्लेषकांचे मत आहे. जपान आणि तैवानमध्येही व्यापार थांबवावा लागला. 

ही घसरण युरोपातील शेअर बाजारातही पाहायला मिळाली. पाकिस्तानमधी घसरण ६% होती, ही ७,२०० अंकांपेक्षा जास्त होती. जगभरातील बाजारपेठांमध्ये घसरण झाल्यामुळे हे घडले. यामुळे शेअर बाजारात व्यवहार थांबवावे लागले.

रतन टाटा यांच्या 'या' कंपनीचे होणार विभाजन! का घेतला इतका मोठा निर्णय?

अमेरिकेने इतर देशांसोबतच्या व्यापारावर नवीन कर लादले आहेत. यामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांसाठी वीज दरात कपात केली होती. यामुळे बाजारात थोडीशी तेजी आली होती.

ट्रेडिंग थांबण्यात आले

शेअर बाजारात जास्त अस्थिरता असते तेव्हा PSX ट्रेडिंग दरवेळी थांबवते. गुंतवणूकदारांनी घाबरून शेअर्स विकू नयेत म्हणून असे केले जाते. याला ऑटोमॅटिक सर्किट ब्रेकर म्हणतात. यामुळे गुंतवणूकदारांना परिस्थिती समजून घेण्याची संधी मिळते. आज ४५-६० मिनिटांसाठी व्यवहार थांबवण्यात आले आणि नंतर दुपारी १.०३ वाजता पुन्हा सुरू करण्यात आले.

PSX नुसार, ज्यावेळी KSE-30 निर्देशांक मागील दिवसापेक्षा 5% ने घसरण असते त्यावेळी ट्रेडिंग थांबवला जातो. यानंतर सर्व जुन्या ऑर्डर रद्द केल्या जातात. बाजार थंड झाल्यानंतर व्यवहार पुन्हा सुरू होतील असे पीएसएक्सचे मत आहे.

जगभरात अनेक ठिकाणी ट्रेडिंग थांबवण्यात आली

जागतिक मंदीचा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर होत आहे. शेअर मार्केट थांबवणारा पाकिस्तान हा एकमेव आशियाई बाजार नाही तर गुंतवणूकदारांनी घाबरून शेअर्स विकू नयेत म्हणून जपान आणि तैवानमधील व्यवहार काही काळासाठी थांबवावे लागले आहेत. गुंतवणूकदारांना मंदीमुळे अमेरिकेतील व्याजदर मे महिन्यातच कमी होऊ शकतात याची भीती आहे . सोमवारी इतर आशियाई बाजारांमध्येही मोठी घसरण झाली. काहींमध्ये ९% पर्यंत घट झाली.

Web Title: Stock market crash news US tariffs hit Pakistan stock market hard, market falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.