Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Crash: शेअर बाजारात हाहाकार, सेंसेक्‍स 1400 अंकांनी कोसळला; न‍िफ्टी धडाम!

Stock Market Crash: शेअर बाजारात हाहाकार, सेंसेक्‍स 1400 अंकांनी कोसळला; न‍िफ्टी धडाम!

Stock Market Updates: ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 52,669.51 इतक्या लो लेव्हलपर्यंत घसला. तर निफ्टीने 15,775.20 अंकाच्या पातळीला स्पर्ष केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:17 PM2022-05-19T17:17:53+5:302022-05-19T17:18:43+5:30

Stock Market Updates: ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 52,669.51 इतक्या लो लेव्हलपर्यंत घसला. तर निफ्टीने 15,775.20 अंकाच्या पातळीला स्पर्ष केला.

Stock Market Crash Sensex crashes by 1400 points share market closed 19th may update | Stock Market Crash: शेअर बाजारात हाहाकार, सेंसेक्‍स 1400 अंकांनी कोसळला; न‍िफ्टी धडाम!

Stock Market Crash: शेअर बाजारात हाहाकार, सेंसेक्‍स 1400 अंकांनी कोसळला; न‍िफ्टी धडाम!

जगभरातील शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावरही बघायला मिळाला. भारतीय शेअर बाजारात आज दिवसभर विक्रीचेच वातावरण होते आणि सेंसेक्‍स व न‍िफ्टी सलग दुसऱ्या दिवशीही घसरणीसह बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 52,669.51 इतक्या लो लेव्हलपर्यंत घसला. तर निफ्टीने 15,775.20 अंकाच्या पातळीला स्पर्ष केला.

न‍िफ्टीमध्ये 400 अंकांपेक्षाही अधिकची घसरण -
ट्रेडिंग सत्राच्या शेवटी 30 अंकांचा सेन्सेक्‍स 1416.30 अंकांनी घसरून 52,792.23 वर आला. तर 50 अंकांचा न‍िफ्टी 430.90 च्या घसरणीसह 15,809.40 अंकांवर बंद झाला. न‍िफ्टीच्या टॉप लूजर्समध्ये व‍िप्रो, एचसीएल टेक्‍नॉलॉजी, टेक मह‍िंद्रा, टीसीएस आणि इंफोस‍िस यांचा समावेश आहे. तर टॉप गेनर्सच्या यादीत केवळ आयटीसी, डॉ. रेड्डी आणि पावरग्र‍िडच्या शेअर्सचा समावेश आहे. आयटीसीचे त‍िमाही पर‍िणाम आल्यानंतर शेअर्समध्ये सुमारे साडेसात टक्क्यांची उसळी दिसून आली होती.

सेंसेक्‍सच्या 3 शेअर्समध्ये तेजी -
आज व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्समधील आयटीसी, डॉ रेड्डीज आणि पॉवरग्रीडचे शेअर्स वगळता इतर सर्व शेअर्समध्ये घसरण दिसून आली. आज दिवसभराच्या व्यवहारादरम्यान मेटल, आयटी, फार्मा, रियल्टी, ऑटो आणि बँकेच्या शेअर्समध्ये मोठा दबाव दिसून आला. यापूर्वी शेअरबाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली होती. तत्पूर्वी, आज सकाळी ओपनिंगवेळी सेंसेक्‍स 53307.88  होता, तर न‍िफ्टी 15971.40 अंकांवर होती. 
 

Web Title: Stock Market Crash Sensex crashes by 1400 points share market closed 19th may update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.