मुंबई - बँका आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांचा विक्रीचा मारा झाल्यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३६.५८ अंकांनी घसरून ३६,३0५.0२ अंकांवर बंद झाला. ६ फेब्रुवारीनंतरची ही सर्वांत मोठी एकदिवसीय घसरण ठरली, तसेच ११ जुलैनंतरचा नीचांकी बंद ठरला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६८.२0 अंकांनी घसरून १0,९७४.९0 अंकांवर बंद झाला. रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण, चीन आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेले व्यापार युद्ध तथा कच्च्या तेलाच्या दराने गाठलेला चार वर्षांचा उच्चांक या गोष्टींमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्यामुळे गेल्या पाच सत्रांपासून बाजारात विक्रीचा मारा सुरू आहे.घसरण झालेल्या कंपन्यांत महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी, एचडीएफसी लि., इंडस्इंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय आणि येस बँक यांचा समावेश आहे.
शेअर बाजार पुन्हा आपटला; सात महिन्यांतील मोठी घसरगुंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 6:08 AM