Join us  

Stock market: बाहेर पडू, की संधी म्हणून पाहू? पोर्टफोलिओ वाढवू, की अजून वाट पाहू?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 6:10 AM

Stock market: शेअर बाजारातील मागील आठवड्यातील पडझड हा बाजाराने तळ गाठला आहे की अजून बाजार पडणार याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे.

- पुष्कर कुलकर्णी  शेअर बाजारातील मागील आठवड्यातील पडझड हा बाजाराने तळ गाठला आहे की अजून बाजार पडणार याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे.

बाजार या कारणांनी  अजून खाली जाऊ शकतो अमेरिकन फेड आणि भारतीय रिझर्व्ह बँकांचे व्याजदर धोरण. वाढत्या  महागाईवर नियंत्रणासाठी पुढील तिमाहीत व्याजदरात अजून वाढ होणे. इंधनाचे दर वाढते राहणे.

बाजार या कारणांनी वाढू शकतो रशिया - युक्रेन युद्धविराम किंवा त्या दिशेने चर्चेस सुरुवात.वरील कारणाने इंधनाचे दर कमी होण्यास सुरुवात होणे.

इकडे लक्ष द्या... आणि संधी म्हणून पाहा...बहुतांश ब्ल्यू चीप कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. उदा. एशियन पेंटस, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक, एल अँड टी, टीसीएस, विप्रो, आदी. अशा शेअर्सवर लक्ष ठेवत खाली आलेल्या भावात गुंतवणुकीचा फायदा घ्या.

नेमके काय करावे?बाजारात नुकसान सोसून बाहेर पडू नये.ऑटो / बँकिंग / फायनान्स / आयटी / कंझम्पशन / मेटल / इन्फ्रा/एनर्जी याचे इंडेक्स खालच्या पातळीवर आले आहेत. यातील चांगल्या शेअर्समध्ये अजून गुंतवणूक वाढवावी. जेणेकरून पोर्टफोलिओ ॲव्हरेजिंग करता येईल.एसआयपीमधील गुंतवणूक सुरू ठेवावी.

नवीन गुंतवणूकदारांनी काय करावे?एकरकमी गुंतवणूक करणार असाल तर त्यातील ५० टक्के आता गुंतवावी. पुढील २५ टक्के सप्टेंबरमध्ये आणि २५ टक्के डिसेंबरमध्ये गुंतविण्याचे नियोजन करावे.दरमहा ठरावीक रक्कम इक्विटीमध्ये गुंतविण्यास सुरुवात करावी. कमी भावात चांगल्या शेअर्समध्ये पुढील ५ ते १० वर्षांचा कालावधी ठेवून रक्कम गुंतवावी.गुंतवणूकदार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करावी.

बाजार तज्ज्ञांचे मत...निफ्टीने जर १४,९०० च्या खाली ट्रेंड करण्यास सुरुवात केली तर बेअरिश ट्रेंड सुरू होऊ शकतो.निफ्टी जर १५,००० च्या वर राहिला आणि रशिया-युक्रेन युद्धविरामबाबत सकारात्मक बाबी घडल्या तर बॉटम बनून पुन्हा वर जाण्याच्या तयारीत असेल.डिसेंबर अखेरपर्यंत बाजारातील चढउतार कायम राहू शकतो. 

बाजार जसा खाली आला आहे तसा भविष्यात वर जाणार हे नक्की. त्यामुळे सध्याच्या निराशेच्या काळात आशेच्या भविष्यासाठी बाजारात टिकून राहणे यातच खरी ‘बाजार’ नीती आहे.

 

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांक