मुंबई : चीनमधील कोरोना विषाणूच्या साथीमुळे मंगळवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८८.२६ अंकांनी घसरून ४0,९६६.८६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६३.२0 अंकांनी घसरत १२,0५५.८0 वर बंद झाला.दरम्यान, मंगळवारी रुपया १२ पैशांनी वाढला. त्याबरोबर एक डॉलरची किंमत ७१.३१ रुपये झाली. चीनमधील कोरोना विषाणूच्या साथीने तेलाची मागणी कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली.
शेअर बाजारात घसरण, रुपया १२ पैशांनी वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 1:03 AM