शेअर बाजारातील चढ उतारांदरम्यानही एका स्टॉकने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरनी दीर्घकाळापर्यंत कायम राहिलेल्या आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न दिलं आहे. या शेअरमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये ११०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. हा स्मॉलकॅप स्टॉक १८ मे २०२० रोजी २८.७५ रुपयांवर बंद झाला होता. १९ मे, २०२३ रोजी बीएसईवर ३५६.५० रुपयांच्या उच्च स्तरावर पोहोचला आहे.
तीन वर्षांपूर्वी जेनेसिस इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यात आलेली १ लाख रुपयांची रक्कम आज १२.४० लाख रुपये एवढी झाली आहे. याच्या तुलनेत यादरम्यान, सेंसेक्स १०४ टक्क्यांनी वाढला आहे. जेनेसिस इंटरनॅशनल स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स ५९.९ टक्क्यांवर आहे. त्यामुळे हा स्टॉक अधिक खरेदी किंवा अधिक विक्री न होणाऱ्या क्षेत्रात काम करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
जेनेसिस इंटरनॅशनचे शेअर ५ दिवस, २० दिवस आणि ५० दिवसांच्या मुव्हिंग एव्हरेजपेक्षा अधिक आहेत. मात्र १०० दिवस आणि २०० दिवसांच्या मुव्हिंग एव्हरेजपेक्षा कमी आहेत. मात्र हा स्टॉक एका वर्षामध्ये २३.६९ टक्क्यांनी कोसळला आहे. तर या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यामध्ये २२.६४ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या एका महिन्याचा विचार केल्यास हा शेअर १३.६१ टक्क्यांनी वधारला आहे. या फर्मचे एकूण १०७५ शेअरनी बीएसईवर ३.६८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. बीएसईवर फर्मचं मार्केट कॅप वाढून १३२६ कोटी रुपये एवढं झालं आहे.
जेनेसिस इंटरनॅशनलने गेल्या तीन वर्षांमध्ये बाजार रिटर्नच्या बाबतीत आपल्या सहकाऱ्यांना मागे टाकलं आहे. सास्केन टेकच्या शेअरमध्ये १२३ टक्के आणि सुबेक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये तीन वर्षांत ४०७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी सहा प्रमोटर्सजवळ फर्ममध्ये ३९.७१ टक्क्यांची भागीदारी होती आणि ७४१६ सार्वजनिक शेअरधारकांकडे ६०.२९ टक्क्यांची भागीदारी होती. यामधील ६८८४ शेअरधारकांजवळ ३५.८१ लाख शेअर किंवा ९.४९ टक्के भागीदारी होती. त्यात २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम होती.