Lokmat Money > बिझनेस न्यूज > गेल्या १५ वर्षांत ११ वेळा मालामाल; गुंतवणूकदारांना जुलैत जॅकपॉट?

गेल्या १५ वर्षांत ११ वेळा मालामाल; गुंतवणूकदारांना जुलैत जॅकपॉट?

८ महिन्यांत ५२ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 05:57 AM2022-07-05T05:57:05+5:302022-07-05T05:57:20+5:30

८ महिन्यांत ५२ लाख कोटी बुडाले

Stock Market Goods 11 times in last 15 years; July jackpot for investors? | गेल्या १५ वर्षांत ११ वेळा मालामाल; गुंतवणूकदारांना जुलैत जॅकपॉट?

गेल्या १५ वर्षांत ११ वेळा मालामाल; गुंतवणूकदारांना जुलैत जॅकपॉट?

नवी दिल्ली : आतापर्यंत जुलै महिना शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा जॅकपॉट ठरला आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये ११ वेळा जुलै महिन्यात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मात्र सध्या स्थिती थोडी वेगळी असून, बाजाराला चारी बाजूंनी संकटांनी घेरले आहे. अशा स्थितीत बाजार कोणती चाल खेळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जून २०२२ मध्ये मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात खरेदी विक्री २३ टक्क्यांनी कमी राहिली आहे. अशामध्ये भारतीय शेअर बाजारात मंदीच्या भीतीतून बाहेर पडताना दिसून येत नाही. भारतीय शेअर बाजारातून वर्ष २०२२ मध्ये आलेल्या घसरणीमुळे कमीत कमी ६० कंपन्या अब्ज डॉलर्स क्लबमधून बाहेर पडल्या आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये जेव्हा सेन्सेक्स आपल्या सर्वकालीन उच्चांकावर म्हणजेच ६२,२४५ च्या स्तरावर पोहोचला होता, त्या वेळी एकूण ४०१ कंपन्यांचे बाजार भांडवल १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होते. आता त्यांची संख्या ३४० इतकी झाली आहे. नोव्हेंबर २०२१ पासून आतापर्यंतच्या ८ महिन्यांत गुंतवणूकदारांचे ५२ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

कशी राहील बाजाराची चाल? 
जुलै महिन्यात कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार असल्याने बाजारामध्ये चढ-उतार राहण्याची शक्यता. या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती, विदेशी गुंतवणूकदारांचा बाहेर पडण्याचा ओघ आणि देशातील आर्थिक वृद्धीचे आकडे यानुसार बाजाराची दिशा ठरत जाणार आहे.

का आहे जुलै महिना महत्त्वाचा?  
शेअर बाजारातील तज्ज्ञांनुसार, जुलै महिन्यात बाजारात तेजी येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कंपन्याचे जून तिमाहीचे जाहीर होणार निकाल. जून महिना सुरू होताच उन्हाच्या झळा कमी होत वर्षासरी येतात. यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार होते. तसेच जुलैत महागाई वाढते त्याचाही परिणाम बाजारावर होतो.

तेजी येण्याची शक्यता आहे का?   
महागाई व डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने बाजाराची वाढ नकारात्मक आहे. रशिया व युक्रेन युद्धामुळे जगभरातील पुरवठा साखळी प्रभावित झाली असल्याने जुलै महिना जॅकपॉट ठरेल याची शक्यता सध्या तरी खूप कमी आहे. 

१५ मधील ११ वर्ष जुलै ने केले मालामाल
११ वेळा पॉझिटिव्ह रिटर्न्स
४ वेळा नुकसान
४ वेळा ५%पेक्षा अधिक परतावा
२००९ च्या जुलैमध्ये सर्वाधिक ८.१२ टक्के परतावा
२०१९ च्या जुलैमध्ये सर्वाधिक -४.६८ टक्के नुकसान

Web Title: Stock Market Goods 11 times in last 15 years; July jackpot for investors?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.