Stock Market: या आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स 241 अंकांनी वाढून 71,106 पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 94 अंकांनी वाढून 21,349 च्या पातळीवर बंद झाला. बाजारातील याच तेजीमुळे काही कंपन्यांच्या शेअर्समध्येही कमालीची वाढ झाली. विशेषत: खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ही वाढ दिसून आली.
भारतीय खाद्य तेल कंपन्यांमध्ये अदानी विल्मर, पतंजली फूड्स, कृती न्यूट्रिएंट्स आणि इतर कंपन्यांनी मोठी कमाई केली. या कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी 7.5 टक्क्यांनी वाढून बंद झाले. शुक्रवारी अदानी समूहातील एफएमसीजी फर्म, अदानी विल्मरचे शेअर्स जवळपास 4 टक्क्यांनी वाढून 365 रुपयांवर बंद झाले. यामुळे BSE वर अदानी विल्मरचे मार्केट कॅप 47,503 कोटी रुपयांवर पोहोचले.
सरकारने घेतला हा निर्णय भारत सरकारने मार्च 2025 पर्यंत कमी करावर खाद्यतेल आयात करण्याची परवानगी दिल्यामुळे खाद्यतेल कंपन्यांचे शेअर्स वधारले. कमी करात आयात केल्यामुळे कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शुक्रवारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. FMCG कंपनी पतंजली फूड्सचे शेअर्स BSE वर 5.55% वाढले आणि Rs 1628 प्रति शेअर वर बंद झाले. या कंपनीचे मार्केट कॅप 58,139 कोटी रुपये आहे.
या शेअर्समध्येही वाढ बीएसईवर सोयाबीन तेल विकणारी कंपनी कृती न्यूट्रिएंट्सचा शेअर 7.42 टक्क्यांनी वाढून 91.24 रुपयांवर पोहोचला. कंपनीचे मार्केट कॅप 4.39 हजार कोटींवर पोहोचले. व्हेजिटेबल ऑइल कंपनी श्री गँग इंडस्ट्रीज अँड अलाईड प्रोडक्ट्स लिमिटेड जवळपास 5 टक्क्यांनी वाढून 126.70 रुपये प्रति शेअरवर गेली, तर मार्केट कॅप 213.37 कोटी रुपयांवर पोहोचले.
(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)