Join us

निर्देशांकांतील तेजीचा सलग तिसरा आठवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 5:20 AM

भारतीय रिझर्व्ह बॅँकेने रेपो दरामध्ये वाढ केली असली तरी चलनवाढीच्या दरामध्ये होऊ घातलेली वाढ, खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर होणारा संभाव्य परिणाम यामुळे बाजारात काहीशी साशंकता होती.

- प्रसाद गो. जोशी

भारतीय रिझर्व्ह बॅँकेने रेपो दरामध्ये वाढ केली असली तरी चलनवाढीच्या दरामध्ये होऊ घातलेली वाढ, खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर होणारा संभाव्य परिणाम यामुळे बाजारात काहीशी साशंकता होती. असे असतानाही संवेदनशील निर्देशांक आणि निफ्टीने सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये वाढ कायम राखण्यात यश मिळविले आहे. मिडकॅप निर्देशांकामध्येही वाढ झाली.मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ घसरणीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३५,५०३.२४ अंशांवर खुला झाला. त्यानंतर सप्ताहामध्ये तो ३५,६२८.४९ ते ३४,७८४.६८ अंशांदरम्यान हेलकावताना दिसून आला. सप्ताहाच्या अखेरीस तो ३५,४४३.६७ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये २१६.४१ अंश म्हणजेच ०.६१ टक्के एवढी वाढ झाली. सलग तिसºया सप्ताहामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ७१.४५ अंशांनी (०.६७ टक्के) वाढून १०,७६७.६५ अंशांवर बंद झाला. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक मिडकॅपमध्ये १६९.८६ अंशांची वाढ, तर स्मॉलकॅपमध्ये ९१.८३ अंशांची घसरण झाली. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप १६,०२२.३७, तर स्मॉलकॅप १६,८८७.१३ अंशांवर बंद झाला.भारतीय रिझर्व्ह बॅँकेने रेपो दरामध्ये वाढ करण्याचा जाहीर केलेला निर्णय बाजारामध्ये उत्साह आणू शकला नाही. या निर्णयानंतर बाजार काहीसा वाढला असला तरी चलनवाढीच्या दरामध्ये वाढ होण्याचा धोका, त्याचा अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होऊ शकणारा विपरीत परिणाम आणि आंतरराष्टÑीय बाजारातील खनिज तेलाच्या दरामध्ये सातत्याने सुरू असलेली दरवाढ यामुळे बाजार धास्तावलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी गत सप्ताहात ५२५.४० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. मात्र देशी वित्तसंस्थांनी ११९७.८९ कोटी रुपयांची खरेदी केली. परकीय चलनाच्या गंगाजळीत पुन्हा घटघसरणारा रुपया आणि सोन्याच्या साठ्यामध्ये झालेली घट यामुळे देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये ५९४ दशलक्ष डॉलरची घट होऊन ती आता ४१२.२३ अब्ज डॉलरवर येऊन पोहोचली आहे. १ जून रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये गंगाजळीत घट झाल्याचे भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये होणारी घट आणि डॉलरची वाढलेली खरेदी यामुळे सोन्याच्या साठ्यामध्ये काहीशी कपात होऊन परकीय चलन गंगाजळी खाली आली आहे.च्देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीने सप्टेंबर महिन्यात ४०० अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा ओलांडला होता. यानंतर १३ एप्रिल रोजी ही गंगाजळी ४२६.०२८ अब्ज अमेरिकन डॉलर अशी उच्चांकी पोहोचली होती. गेल्या काही महिन्यांपासून परकीय चलन गंगाजळीमध्ये सातत्याने घट होत आहे.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांक