Join us

सेन्सेक्स 551 अंकांनी आपटला तर निफ्टी 19700 च्या खाली; 2.39 लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 4:34 PM

सर्वाधिक फटका बँकिंग आणि फायनान्शिअल सेक्टरला बसला.

Share Market Update: इस्रायल-हमास युद्धाच्या चिंतेत बुधवारी(18 ऑक्टोबर) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 550 अंकांनी घसरुन 66,000 च्या खाली आला, तर निफ्टीही 19,700 च्या खाली घसरले. यामुळे आज शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांचे सुमारे 2.39 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. ब्रॉडर मार्केटमध्येही विक्री पाहायला मिळाली. BSE मिडकॅप निर्देशांक 0.85 टक्क्यांनी घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.32 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्रातील निर्देशांकही लाल रंगात बंद झाले.

व्यवहाराच्या शेवटी BSE सेन्सेक्स 551.07 अंकांनी किंवा 0.83% घसरुन 65,877.02 वर बंद झाला. NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 140.40 अंकांनी किंवा 0.71% घसरून 19,671.10 वर बंद झाला.

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज(18 ऑक्टोबर) रोजी 321.43 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे, 17 ऑक्टोबर रोजी 323.82 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.39 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.39 लाख कोटी रुपयांची घट झाली.

सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक परतावा देणारे शेअर

सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 4 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.92 टक्के वाढ झाली आहे. सन फार्मा, मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 0.27% ते 1.46% च्या वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले शेअरसेन्सेक्समधील 8 शेअर्स आज लाल रंगात बंद झाले. यापैकी बजाज फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक 2.85 टक्क्यांनी घसरले. याशिवाय बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 1.42 ते 2.02 टक्क्यांची घसरण दिसून आली.

डिस्क्लेमर: आम्ही शेअर बाजाराच्या कामगिरीविषयी माहिती देत आहोत. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला आवश्य घ्या. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकव्यवसाय