Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार महिन्याच्या नीचांकावर

शेअर बाजार महिन्याच्या नीचांकावर

या आठवड्यात होणाऱ्या अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदर वाढविले जाण्याची भीती कायम असल्यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजार घसरून १ महिन्याच्या नीचांकावर गेले.

By admin | Published: March 16, 2015 11:29 PM2015-03-16T23:29:12+5:302015-03-16T23:29:12+5:30

या आठवड्यात होणाऱ्या अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदर वाढविले जाण्याची भीती कायम असल्यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजार घसरून १ महिन्याच्या नीचांकावर गेले.

The stock market is at the lowest of the month | शेअर बाजार महिन्याच्या नीचांकावर

शेअर बाजार महिन्याच्या नीचांकावर

मुंबई : या आठवड्यात होणाऱ्या अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदर वाढविले जाण्याची भीती कायम असल्यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजार घसरून १ महिन्याच्या नीचांकावर गेले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६५.५९ अंकांनी घसरून २८,४३७.७१ अंकांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४.६0 अंकांनी घसरून ८,६३३.१५ अंकांवर बंद झाला.
३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सुरुवातीला तेजीत होता. २८,५८१.८२ अंकांपर्यंत वर चढला होता. तथापि, नंतर तो घसरला. एका क्षणी तो २८,३८४.0९ अंकांपर्यंत खाली गेला होता. नंतर थोडी तेजी दाखवून तो २८,४३७.७१ अंकांवर बंद झाला. ६५.५९ अंक अथवा 0.२३ टक्के घसरण त्याने नोंदविली. त्याआधी शुक्रवारी सेन्सेक्सने ४२७.११ अंकांनी घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४.६0 अंकांनी अथवा 0.१७ टक्क्यांनी घसरून ८,६३३.१५ अंकांवर बंद झाला. हा एक महिन्याचा नीचांक ठरला आहे. त्याआधी निफ्टी ८,६६३.५५ अंकांपर्यंत वर चढला होता, तसेच ८,६१२ अंकांपर्यंत खालीही घसरला होता.
चीन, हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील बाजार 0.0८ टक्के ते २.२६ टक्क्यांनी वाढले. जपान आणि तैवान येथील बाजार 0.0४ टक्के ते 0.६९ टक्के घसरले. युरोपीय बाजार सकाळच्या सत्रात तेजी दर्शवीत होते. फ्रान्सचा कॅक 0.६५ टक्क्यांनी, जर्मनीचा डॅक्स 0.९७ टक्क्यांनी, तर ब्रिटनचा एफटीएसई 0.१६ टक्क्यांनी तेजीत होता.

तत्पूर्वी, शुक्रवारी विदेशी संस्थांनी ६६.९८ कोटी रुपयांची शेअर खरेदी केल्याचे शेअर बाजारात सादर करण्यात आलेल्या हंगामी आकडेवारीवरून स्पष्ट झाले.


४सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १९ कंपन्यांचे समभाग घसरले. स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.८७ टक्के आणि 0.३४ टक्के घसरले.
४घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत सेसा स्टरलाईट, हिंदाल्को, भारती एअरटेल, एनटीपीसी, डॉ. रेड्डीज लॅब, एचडीएफसी, गेल, सिप्ला, आयटीसी, एचयूएल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश होता. इन्फोसिस, सन फार्मा, टाटा पॉवर, भेल आणि विप्रो यांचे समभाग मात्र वाढले.
४बाजाराची एकूण व्याप्ती घसरणीचीच राहिली. १,८५९ कंपन्यांचे समभाग घसरले. १,0२४ कंपन्यांचे समभाग वर चढले. १२६ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल घसरून ३,२३३.0८ कोटी झाली. आदल्या सत्रात ती ३,८५५.६0 कोटी होती.

 

Web Title: The stock market is at the lowest of the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.