Lokmat Money > बिझनेस न्यूज > मंकीपॉक्समुळे 'या' कंपन्यांच्या शेअर्सनी घेतला रॉकेट स्पीड! गुंतवणूकदारांमध्ये डिमांड वाढली!

मंकीपॉक्समुळे 'या' कंपन्यांच्या शेअर्सनी घेतला रॉकेट स्पीड! गुंतवणूकदारांमध्ये डिमांड वाढली!

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मंकीपॉक्सची लस, औषध आणि इतर उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये या काळात चांगली उसळी बघायला मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 04:45 PM2022-07-31T16:45:50+5:302022-07-31T16:46:58+5:30

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मंकीपॉक्सची लस, औषध आणि इतर उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये या काळात चांगली उसळी बघायला मिळाली आहे.

Stock market Monkeypox effect the shares of these companies increased demand among investors | मंकीपॉक्समुळे 'या' कंपन्यांच्या शेअर्सनी घेतला रॉकेट स्पीड! गुंतवणूकदारांमध्ये डिमांड वाढली!

मंकीपॉक्समुळे 'या' कंपन्यांच्या शेअर्सनी घेतला रॉकेट स्पीड! गुंतवणूकदारांमध्ये डिमांड वाढली!

मंकीपॉक्सच्या (Monkeypox) रुपाने जगासमोर एक नवी समस्या उभी ठाकली आहे. मात्र असे असतानाच, शेअर बाजारातगुंतवणूक करणारे लोक, ज्या कंपन्यांचे शेअर्स आगामी काळात चांगला परतावा देऊ शकतील, अशा शेअर्सच्या शोधात गुंतले आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मंकीपॉक्सची लस, औषध आणि इतर उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये या काळात चांगली उसळी बघायला मिळाली आहे.

या कंपन्यांच्या शेअर्सची डिमांड वाढली -
मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे, Bavarian Nordic, सिगा टेक्नालॉजी आणि Precision सिस्टिम सायन्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. ब्लूमबर्गनुसार, 70 हून अधिक देशांत हा व्हायरस पसल्यामुळे, जगभरात त्याची दहशत निर्माण झाली आहे.  

काय म्हणतायत तज्ज्ञ -
सिंगापूरच्या Straits इंव्हेस्टमेन्ट कंपनीचे फंड मॅनेजर मनीष भार्गव यांनी म्हटले आहे, की सध्या संपूर्ण जग केवळ Bavarian Nordic वरच व्हॅक्सीन प्रोडक्शनसाठी अवलंबून आहे. यामुळे गुंतवणूकदार काही इतर कंपन्यांकडे आशेने पाहत आहेत. तसेच येणाऱ्या काळात या कंपन्याही मंकीपॉक्सचा सामनाकरण्यासाठी लस अथवा इतर उत्पादने तयार करू शकतात. यूएस रिटेल इंव्हेस्टर्समध्ये या शेअर्सची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

ब्लूमबर्गनुसार, मंकीपाॅक्स टेस्ट करण्यासाठी वापरले जाणारे टूल्स, तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. जपानमधील कंपनी Precision च्या शेअरच्या किंमतीत जूनपासून आतापर्यंत दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच, चीनच्या जवळपास 30 कंपन्यांना मंकीपाॅक्स टेस्टिंग किट्स तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. येणाऱ्या काळात या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी बघायला मिळू शकते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Stock market Monkeypox effect the shares of these companies increased demand among investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.