Lokmat Money > बिझनेस न्यूज > केवळ 2 रुपयांच्या शेअरची कमाल, लखपती झाले करोडपती; 1 लाखाचे केले 3 कोटी!

केवळ 2 रुपयांच्या शेअरची कमाल, लखपती झाले करोडपती; 1 लाखाचे केले 3 कोटी!

बोनस शेअरमुळे कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवण्यात आलेले 1 लाख रुपये आता 3 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 11:47 PM2023-09-30T23:47:03+5:302023-09-30T23:48:43+5:30

बोनस शेअरमुळे कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवण्यात आलेले 1 लाख रुपये आता 3 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाले आहेत.

Stock Market Multibagger avanti feeds shares turned rs 1 lakh investment into more than rs3 crore | केवळ 2 रुपयांच्या शेअरची कमाल, लखपती झाले करोडपती; 1 लाखाचे केले 3 कोटी!

केवळ 2 रुपयांच्या शेअरची कमाल, लखपती झाले करोडपती; 1 लाखाचे केले 3 कोटी!

सी फूड उत्पादनांच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या अवंती फीड्स, या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परताना दिला आहे. गेल्या 13 वर्षांत कंपनीचा शेअर 2 रुपयांवरून 440 रुपयांवर पोहोचला आहे. अवंती फीडच्या शेअरने या कालावधीत तब्बल 21000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. अवंती फीड्सने या कालावधीत आपल्या गुतंवणूकदारांना एकदा बोनस शेअरही दिला आहे. बोनस शेअरमुळे कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवण्यात आलेले 1 लाख रुपये आता 3 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाले आहेत.

1 लाखाचे झाले 3 कोटीहून अधिक -
अवंती फीड्सचा शेअर 17 सप्टेंबर 2010 रोजी 2.03 रुपयांवर होता. तो 29 सप्टेंबर 2023 रोजी 441.50 रुपयांवर बंद झाला. अवंती फीड्सने जून 2018 मध्ये प्रत्येक 2 शेअरवर 1 बोनस शेअर दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 17 सप्टेंबर 2010 रोजी अवंती फीड्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, त्याला 49260 शेअर मिळाले असते. बोनस शेअर मिळाल्यानंतर, एकूण शेअर्सची संख्या 73890 झाली असती. सध्याच्या शेअर प्राईसनुसार, या शेअर्सची एकूण किंमत 3.26 कोटी रुपये एवढी असती. अर्थात, 1 लाख रुपयांची गुंतवणूक आता 3.26 कोटी रुपये झाली असती.

10 वर्षांत 3700% ची तेजी - 
अवंती फीड्सच्या शेअरमध्ये गेल्या 10 वर्षांत जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 16 ऑगस्ट 2013 रोजी 11.40 रुपयांवर होता. तो 29 सप्टेंबर 2023 रोजी 441.50 रुपयांवर पोहोचला आहे. अवंती फीड्सच्या शेअरने गेल्या 10 वर्षांत 3770 टक्क्यांचा परतावा दिला आहे. अवंती फीड्सच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 504.85 रुपये आहे. तर निचांक 321.15 रुपये एवढा आहे. तसेच कंपनीचे मार्केट कॅप 6015 कोटी रुपये आहे.

Web Title: Stock Market Multibagger avanti feeds shares turned rs 1 lakh investment into more than rs3 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.