Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market: अबब... ७.६ लाख कोटी रुपये जाणार भारताबाहेर, ‘ब्लॅक स्वॅन’ स्थितीचा भारताला फटका

Stock Market: अबब... ७.६ लाख कोटी रुपये जाणार भारताबाहेर, ‘ब्लॅक स्वॅन’ स्थितीचा भारताला फटका

Stock Market: मोठी जागतिक जोखीम अथवा ‘ब्लॅक स्वॅन’ स्थितीमुळे भारतातील १०० अब्ज डॉलर म्हणजेच ७,८०,००० कोटी रुपयांचे भांडवल भारताबाहेर जाऊ शकते, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 11:59 AM2022-06-21T11:59:26+5:302022-06-21T12:00:21+5:30

Stock Market: मोठी जागतिक जोखीम अथवा ‘ब्लॅक स्वॅन’ स्थितीमुळे भारतातील १०० अब्ज डॉलर म्हणजेच ७,८०,००० कोटी रुपयांचे भांडवल भारताबाहेर जाऊ शकते, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) म्हटले आहे.

Stock Market: Now ... Rs 7.6 lakh crore will go out of India, 'black swan' situation hits India | Stock Market: अबब... ७.६ लाख कोटी रुपये जाणार भारताबाहेर, ‘ब्लॅक स्वॅन’ स्थितीचा भारताला फटका

Stock Market: अबब... ७.६ लाख कोटी रुपये जाणार भारताबाहेर, ‘ब्लॅक स्वॅन’ स्थितीचा भारताला फटका

मुंबई : मोठी जागतिक जोखीम अथवा ‘ब्लॅक स्वॅन’ स्थितीमुळे भारतातील १०० अब्ज डॉलर म्हणजेच ७,८०,००० कोटी रुपयांचे भांडवल भारताबाहेर जाऊ शकते, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) म्हटले आहे.

आरबीआयने जारी केलेल्या एका अभ्यासात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, अतिउच्च प्रकारच्या जोखिमेमुळे अथवा ‘ब्लॅक स्वॅन’ स्थितीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का लागू शकतो. कोविडसारखी स्थिती अथवा जागतिक वित्तीय संकट (जीएफएल) यामुळे ही जोखीम निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत भारतातून ५ टक्के पोर्टफोलिओ भांडवली बहिर्गमन होऊ शकते. हे प्रमाण जीडीपीच्या ३ टक्के अथवा १००.६ अब्ज डॉलर (७.८ लाख कोटी रुपये) असू शकते. 

अहवालानुसार, डिसेंबर २०२१ च्या अखेरीस भारतातील एकूण पोर्टफोलिओ गुंतवणूक २८८ अब्ज डॉलर होती तसेच अल्पकालीन व्यापार ऋण ११० अब्ज डॉलर होते.२०२२ वर्षात आतापर्यंत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतातून २,०८,५८७ कोटी रुपये (२६.७५ अब्ज डॉलर) काढून घेतले आहेत. यातील १,९८,५८५ कोटी रुपये शेअर बाजारातून काढले गेले आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक काढली जाण्यास फेडरलच्या नेतृत्वाखालील पतधोरण कठोर होणे कारणीभूत आहे. 

१७ टक्क्यांनी शेअर बाजार कोसळले
- युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात पुरवठा साखळी विस्कळीत होऊन महागाईचा आगडोंब उसळला आहे. 
-महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी जागतिक पातळीवर पतधोरण आवळण्यात आले आहे. 
- ऑक्टोबर २०२१ पासून शेअर बाजार १७ टक्क्यांनी कोसळले आहेत.
- महागाई आणखी वाढल्यास व्याजदर आणखी वाढणार आहेत.

Web Title: Stock Market: Now ... Rs 7.6 lakh crore will go out of India, 'black swan' situation hits India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.