Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Opening: शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र सुरुवात; हिंदाल्को, HUL मध्ये मोठी घसरण

Stock Market Opening: शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र सुरुवात; हिंदाल्को, HUL मध्ये मोठी घसरण

आज शेअर बाजाराची सुरुवात संमिश्र झाली असून बीएसई सेन्सेक्स १६.३२ अंकांनी म्हणजेच ८०,०९८ अंकांवर सुरू झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 10:06 AM2024-10-24T10:06:26+5:302024-10-24T10:06:26+5:30

आज शेअर बाजाराची सुरुवात संमिश्र झाली असून बीएसई सेन्सेक्स १६.३२ अंकांनी म्हणजेच ८०,०९८ अंकांवर सुरू झाला.

Stock Market Opening Mixed opening of Sensex Nifty in the stock market Big decline in Hindalco HUL | Stock Market Opening: शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र सुरुवात; हिंदाल्को, HUL मध्ये मोठी घसरण

Stock Market Opening: शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र सुरुवात; हिंदाल्को, HUL मध्ये मोठी घसरण

Stock Market Opening: देशांतर्गत शेअर बाजारातील संमिश्र स्थितीमुळे शेअर बाजारात कामकाजाची सुरुवातही आज मंदावली. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअरमध्ये आज फ्लॅट ओपनिंग झालं. एचयूएल आणि हिंडाल्कोसारख्या शेअर्समध्ये ४ -४ टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळत आहे. आज निफ्टीचीही वीकली एक्सपायरी आहे.

आज शेअर बाजाराची सुरुवात संमिश्र झाली असून बीएसई सेन्सेक्स १६.३२ अंकांनी म्हणजेच ८०,०९८ अंकांवर सुरू झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४,४१२ च्या पातळीवर उघडला. बुधवारी कामकाजाच्या अखेरिस शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता.

शेअर्सची स्थिती काय?

सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी १६ शेअर्समध्ये तेजी असून १४ शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. एचडीएफसी बँकेला सर्वाधिक फायदा होताना दिसत असून त्यात १.४० टक्क्यांची वाढ झाली. तर दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा ०.८५ टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंट ०.७० टक्क्यांनी वधारले. एनटीपीसी, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी आहे.

प्री ओपनिंगमध्ये बीएसई सेन्सेक्स ९१ अकांच्या तेजीसह ८०,१७३ वर उघडला होता. तर निफ्टीमध्ये घसरण दिसून आली होती. निफ्टी १६ अंकांच्या घसरणीसह २४,४१८ अंकांवर खुला झाला होता.

Web Title: Stock Market Opening Mixed opening of Sensex Nifty in the stock market Big decline in Hindalco HUL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.