Join us

Stock Market Opening: RBI पॉलिसीपूर्वी शेअर बाजारात तेजी; 'या' बँकेचा शेअर ठरणार बिग गेनर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 9:47 AM

Stock Market Opening: देशांतर्गत शेअर बाजाराची हालचाल आज वेगवान असून आयटी व्यतिरिक्त बँक निफ्टीही तेजीत आहे. मात्र, बँक निफ्टी आरबीआयच्या पतधोरणाची वाट पाहत आहे.

Stock Market Opening : आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजार सावरायला सुरुवात झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीचे निर्णय आज जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. आज बँक निफ्टी सुमारे २०० अंकांनी उघडला आहे तर निफ्टी आयटीमध्येही २०० अंकांची वाढ दिसून येत आहे. आयटी शेअर्सव्यतिरिक्त, बँक निफ्टी तेजीत असून एसबीआय आजचा बिग गेनर आहे.

शेअर बाजाराची सुरुवात कशी झाली?बीएसईचा सेन्सेक्स ३१९.७७ अंक किंवा ०.३९ टक्क्यांच्या वाढीसह ८१,९५४.५८ वर उघडण्यात यशस्वी झाला. तर एनएसईचा निफ्टी ५२.६५ अंक किंवा ०.२१ टक्क्यांच्या वाढीसह २५,०६५.८० वर उघडला आहे.

मार्केटचे प्री-ओपनिंग कसे होते?BSE चा सेन्सेक्स २९९.३० अंकांच्या किंवा ०.३७ टक्क्यांच्या वाढीसह ८१९३४.११ च्या स्तरावर आणि NSE चा निफ्टी ४९.३० अंकांच्या किंवा ०.२० टक्क्यांच्या वाढीसह २५०६२.५० च्या पातळीवर व्यवहार करत होता. गिफ्ट निफ्टीची पातळी देखील आज देशांतर्गत शेअर बाजाराची चांगली सुरुवात होण्याचे संकेत देत होती. तो २३.८५ अंकांनी वाढून २५१५५ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक