Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्समध्ये ५५७ अंकांची वाढ, निफ्टीही वधारला

Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्समध्ये ५५७ अंकांची वाढ, निफ्टीही वधारला

जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचाही शेअर बाजारावर परिणाम दिसून आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 10:06 AM2024-01-20T10:06:05+5:302024-01-20T10:06:16+5:30

जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचाही शेअर बाजारावर परिणाम दिसून आला.

Stock market opening with a boom Sensex gains 557 points Nifty also rises reliance hul shares down | Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्समध्ये ५५७ अंकांची वाढ, निफ्टीही वधारला

Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्समध्ये ५५७ अंकांची वाढ, निफ्टीही वधारला

सोमवारी २२ जानेवारी रोजी शेअर बाजाराचं कामकाज बंद राहणार आहे. दरम्यान, आज म्हणजेच शनिवारी शेअर बाजाराचं पूर्ण दिवस कामकाज होईल. शनिवारी शेअर बाजारात मोठा उत्साह दिसून आला. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचाही शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. तर दुसरीकडे अमेरिकन बाजारही सध्या उच्चांकी स्तरावर आहे.

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये ५५७ अंकांची वाढ होऊन तो ७१७४४.५९ अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टीमध्येही २०४.१० अंकांची वाढ होऊन तो २१६६६.३५ अंकांवर पोहोचला होता. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे निकाल जाहीर करण्यात आले होते. रिलायन्सचा नफाही वाढल्याचं निकालातून समोर आलं. परंतु शनिवारी कामकाजादरम्यान रिलायन्सच्या शेअरमध्ये ५.९५ टक्क्यांची घसरण होई ते २७२९.९५ रुपयांवर पोहोचले.

कामकाजादरम्यान हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. कामकाजादरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांची घसरण होऊन ते २४९६.१० रुपयांवर आले. तर दुसरीकडे रेल्वेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आयआरटीसी आणि आरवीएनएलच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

Web Title: Stock market opening with a boom Sensex gains 557 points Nifty also rises reliance hul shares down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.