मुंबई : एक दिवसाच्या घसरणीनंतर बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी वाढून सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळीच तेजीसह उघडला होता. चढ-उतारानंतर तो ४५.९७ अंकांच्या अथवा 0.१७ टक्क्यांच्या वाढीसह २६,७१३.९३ अंकांवर बंद झाला. काल तो ५७.६४ अंकांनी घसरला होता. व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९.८५ अंकांनी अथवा 0.२४ टक्क्यांनी वाढून ८,१७९.९५ अंकांवर बंद झाला. भारती एअरटेलचा समभाग ३.१७ टक्क्यांनी वाढला. सेन्सेक्सच्या सुधारणेत त्याचा मोठा हातभार लागला. आयटीसी आणि टीसीएस यांचे समभागही वाढले. तेजीचा लाभ मिळविणाऱ्या अन्य कंपन्यांत कोल इंडिया, विप्रो, एनटीपीसी, लुपीन, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, एचडीएफसी आणि गेल यांचा समावेश आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, भेल, टाटा मोटर्स, सिप्ला, सन फार्मा, टाटा स्टील, आरआयएल, एल अॅण्ड टी, एचडीएफसी बँक, हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, बजाज आॅटो, मारुती सुझुकी यांचे समभाग मात्र घसरले. सोने महागसराफा बाजारात सोन्याचा भाव १५0 रुपयांनी वाढून प्रति १0 ग्रॅम २९ हजार रुपयांच्या वर गेला. चांदी मात्र १४0 रुपयांनी घसरून ३८,७६0 रुपये किलो झाली. जागतिक बाजारातही सोने महागले.दिल्लीत ९९.९ टक्के व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १५0 रुपयांनी वाढले.
शेअर बाजार पुन्हा तेजीत
By admin | Published: June 02, 2016 2:51 AM