मुंबई : दोन दिवसांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी ८५ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७ अंकांनी वधारला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स बुधवारी ३१0 अंक घसरून २८ हजारांखाली आला होता. सेन्सेक्सला बसलेला हा सात आठवड्यांतील सर्वांत मोठा फटका होता. तसेच गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ४0८ अंकांनी घसरला होता. या मरगळीतून बाजार गुरुवारी बाहेर पडला. दिवसभराच्या अस्थैर्यानंतर सत्राच्या अखेरीस तो ८४.७२ अंकांनी अथवा वाढून २७,८५९.६0 अंकांवर बंद झाला. निफ्टी १६.८५ अंकांनी वाढून ८,५९२.१५ अंकांवर बंद झाला.
शेअर बाजार ८५ अंकांनी सावरला
By admin | Published: August 12, 2016 4:00 AM