Stock Market Closing On 9 July 2024 :शेअर बाजारासाठी मंगळवारचा(दि.9) दिवस अत्यंत शुभ ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वकालीन उच्चांक गाठला. आजच्या सत्रात BSE सेन्सेक्स 391.26 अंकांच्या वाढीसह 80,351 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा Nifti 112.65 अंकांच्या वाढीसह 24,433.20 अंकांवर बंद झाला. ऑटो, एफएमसीजी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स सेक्टरच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराने वेग पकडला.
मार्केट कॅप ऑल टाईम हायवरया वाढीमुळे शेअर बाजाराच्या एकूण मूल्यात मोठी वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 451.26 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 449.71 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.55 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात कंझ्यूमर ड्यूरेबल्स, वाहन, एफएमसीजी, हेल्थकेअर, फार्मा, बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. तर आयटी, ऑईल&गॅस, एनर्जी शेअर्स घसरले. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 19 वाढीसह, तर 11 तोट्यासह बंद झाले.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्सआजच्या व्यवहारात मारुती सुझुकीचे शेअर्स सर्वाधिक 6.60 टक्क्यांनी वाढले. महिंद्रा अँड महिंद्रा 2.51 टक्क्यांनी, आयटीसी 2.09 टक्क्यांनी, सन फार्मा 1.97 टक्क्यांनी, टायटन 1.96 टक्क्यांनी, टाटा मोटर्स 1.24 टक्क्यांनी, नेस्ले 1.05 टक्क्यांनी, L&T 0.93 टक्क्यांनी, ICICI बँक 0.8 टक्क्यांनी वधारले. तर, बजाज फिनसर्व्ह 0.88 टक्के. रिलायन्स 0.69 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.61 टक्के, बजाज फायनान्स 0.44 टक्के, टाटा स्टील 0.29 टक्क्यांनी घसरले.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)