Lokmat Money > बिझनेस न्यूज > आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजार 792 अंकांनी कोसळला, 4 दिवसांत बुडाले 9 लाख कोटी

आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजार 792 अंकांनी कोसळला, 4 दिवसांत बुडाले 9 लाख कोटी

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समिती(एमपीसी)ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न केल्यानं शेअर बाजार कोसळला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 04:26 PM2018-10-05T16:26:15+5:302018-10-05T16:26:45+5:30

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समिती(एमपीसी)ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न केल्यानं शेअर बाजार कोसळला आहे.

stock market sensex nifty down dalal street | आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजार 792 अंकांनी कोसळला, 4 दिवसांत बुडाले 9 लाख कोटी

आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजार 792 अंकांनी कोसळला, 4 दिवसांत बुडाले 9 लाख कोटी

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समिती(एमपीसी)ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न केल्यानं शेअर बाजार कोसळला आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजारानं 792 अंकांची आपटी खाल्ली असून, तो 34374 अंकांवर बंद झाला आहे. तर निफ्टीही 283 अंकांनी कोसळून 10316च्या स्तरावर स्थिरावलाय.

शेअर बाजारात गेल्या चार दिवसांपासून सातत्यानं होत असलेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. टाटा स्टील, पॉवर ग्रीड, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, एचडीएफसी लिमिटेड, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, येस बँक, आयसीआयसीआय बँक, अदाणी पोर्टस्, कोटक बँक, टीसीएस, वेदांता लि., आरआयएल, सन फार्मा, एसबीआय, एलअँडटी, विप्रो, इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग घसरले.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, भारताची वाढती व्यापारी तूट, अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांत वाढ केली जाण्याची शक्यता आणि जागतिक बाजारातील नकारात्मक बातम्या ही बाजाराच्या घसरणीची आणखी काही कारणे आहेत.

Web Title: stock market sensex nifty down dalal street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.