Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market: अदानी समूहावर शेअर बाजाराची नजर

Stock Market: अदानी समूहावर शेअर बाजाराची नजर

Stock Market: आगामी सप्ताहात सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतील मुद्दे यामुळे बाजारात गुंतवणूकदार सावध झाले असून त्यांनी विक्री करून नफा कमावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 06:12 AM2023-01-30T06:12:04+5:302023-01-30T06:12:46+5:30

Stock Market: आगामी सप्ताहात सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतील मुद्दे यामुळे बाजारात गुंतवणूकदार सावध झाले असून त्यांनी विक्री करून नफा कमावला.

Stock Market: Stock market eyes on Adani Group | Stock Market: अदानी समूहावर शेअर बाजाराची नजर

Stock Market: अदानी समूहावर शेअर बाजाराची नजर

- प्रसाद गो. जोशी
आगामी सप्ताहात सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतील मुद्दे यामुळे बाजारात गुंतवणूकदार सावध झाले असून त्यांनी विक्री करून नफा कमावला. यामुळे बाजारात मोठी घसरण झाली असून त्याने तीन महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. याचवेळी हिंडेनबर्गच्या संशोधन अहवालाचा दबाव सोमवारीही बाजारावर राहण्याची शक्यता आहे. अदानी समूहावर संपूर्ण बाजाराची नजर राहणार आहे.
गत सप्ताहात बाजारात विक्रीचा जोर होता. आगामी सप्ताहात लोकसभेमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय मिळणार याची बाजारात उत्सुकता आहे.

१७,००० कोटी रुपये काढले...
nपरकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहात मोठ्या प्रमाणात विक्री केली. जानेवारी महिन्यात या संस्थांनी शेअर्स मधून१७ हजार कोटी रुपये काढून घेतले. 
nपरकीय वित्तसंस्थांचा ओढा आता चीनकडे वाढत आहे. 

२.१६ लाख कोटींचा फटका
nशेअर बाजारातील प्रमुख १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या भागभांडवलात गेल्या आठवड्यात तब्बल २ लाख १६ हजार ९२ कोटी रुपयांची घसरण झाली आहे. 
nसर्वाधिक नुकसान रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एसबीआय यांना झाले आहे. गेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २.१२ टक्क्यांनी खाली आला. टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांना फायदा झाला आहे.

परकीय वित्त संस्थाही विक्रीसाठी उतरल्याने घसरण तीव्र झाली. सप्ताहात निर्देशांक १२९०.८७ अंशांनी खाली येऊन ५९,३०३.९० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक (निफ्टी) ४२३.३० अंश कमी होऊन १७,६०४.३५ अंशावर स्थिरावला. मिडकॅप आणि स्माॅलकॅप निर्देशांकही खाली आले. बॅंका, वित्तसंस्था, ऊर्जा, धातू आणि पायाभूत सेवा कंपन्यांच्या समभागांच्या किंमती घसरल्या तर वाहन कंपन्यांचे शेअर्स वाढले. 

Web Title: Stock Market: Stock market eyes on Adani Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.