Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारांनी केला तीन महिन्यांचा उच्चांक

शेअर बाजारांनी केला तीन महिन्यांचा उच्चांक

एफडीआयच्या नियमांत सुलभता आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गुरुवारी शेअर बाजार उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४८ अंकांनी वाढून २८,४४६.१२ अंकांवर बंद झाला.

By admin | Published: July 17, 2015 04:27 AM2015-07-17T04:27:34+5:302015-07-17T04:27:34+5:30

एफडीआयच्या नियमांत सुलभता आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गुरुवारी शेअर बाजार उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४८ अंकांनी वाढून २८,४४६.१२ अंकांवर बंद झाला.

Stock market surged to three-month high | शेअर बाजारांनी केला तीन महिन्यांचा उच्चांक

शेअर बाजारांनी केला तीन महिन्यांचा उच्चांक

मुंबई : एफडीआयच्या नियमांत सुलभता आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गुरुवारी शेअर बाजार उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४८ अंकांनी वाढून २८,४४६.१२ अंकांवर बंद झाला. निफ्टी ८,६0८.0५ अंकांवर बंद झाला आहे. दोन्ही निर्देशांक ३ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २८,२५९.७0 अंकांवर तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढून २८,४४६.१२ अंकांवर बंद झाला. २४७.८३ अंकांची अथवा 0.८८ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. १६ एप्रिल रोजी सेन्सेक्स २८,६६६.0४ अंकांवर बंद झाला होता. त्यानंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८४.२५ अंकांनी अथवा 0.९९ टक्क्यांनी वाढून ८,६0८.0५ अंकांवर बंद झाला. निफ्टीही १६ एप्रिल रोजी ८,७0६.७0 अंकांवर बंद झाला होता. त्यानंतरची त्याची ही सर्वोच्च पातळी ठरली आहे.
बाजाराची एकूण व्याप्ती मजबूत राहिली. १,५६९ कंपन्यांचे समभाग वाढले. १,२४४ कंपन्यांचे समभाग घसरले. १३७ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची उलाढाल वाढून २,७७७.४३ कोटी झाली. काल ती २,७५0.१४ कोटी होती.
जागतिक बाजारांपैकी युरोपीय बाजारांत तेजीचे वारे दिसून आले. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार सकाळी 0.५१ टक्के ते १.५८ टक्के तेजी दर्शवीत होते. आशियाई बाजारांपैकी चीन, हाँगकाँग, सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया येथील बाजार 0.४३ टक्के ते 0.७२ टक्के वाढले. तैवान येथील बाजार मात्र 0.१३ टक्के घसरला.

Web Title: Stock market surged to three-month high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.