Join us

Stock Market: टाटचे हे तीन शेअर वाढवताहेत गुंतवणूकदारांचं टेन्शन, यावर्षी केलंय कोट्यवधींचं नुकसान  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 3:38 PM

Stock Market: २०२२ हे वर्ष अखेरच्या टप्प्यात आहे. या वर्षातही काही शेअर्सनी चांगली कामगिरी केली. तर काही शेअर्स घसरले. या शेअर्समध्ये टाटा ग्रुपच्या तीन शेअरचा समावेश आहे.

कंपन्यांचं नाव, त्यांची आर्थिक परिस्थिती, भविष्यातील भवितव्य याचा अंदाज घेऊन लोक शेअर्समध्ये पैसे गुंतवत असतात. शेअर बाजारामध्ये हजारोंच्या संख्येने शेअर आहेत. या शेअर्समधील अनेक शेअर सातत्याने वर जात आहेत. तर काही शेअर्सची घसरण होत असते. आता २०२२ हे वर्ष अखेरच्या टप्प्यात आहे. या वर्षातही काही शेअर्सनी चांगली कामगिरी केली. तर काही शेअर्स घसरले. या शेअर्समध्ये टाटा ग्रुपच्या तीन शेअरचा समावेश आहे. या तीन कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. या शेअर्सबाबतची माहिती पुढीलप्रमाणे.टाटा मोटर्सटाटा ग्रुपमध्ये टाटा मोटर्स कंपनीचा वाटा महत्त्वाचा आहे. मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. या वर्षी २६ डिसेंबर २०२२ पर्यंत टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये २२ टक्क्यांनी मोठी घट झाली आहे. यावर्षी टाटा मोटर्सचा एनएसईवरील ५२ आठवड्यातील उच्चांकी भाव हा ५२८.५० रुपये एवढा राहिला आहे. तर ५२ आठवड्यांमधील निचांकी भाव हा ३६६.२० रुपये एवढा राहिला आहे. सध्या हा शेअर सुमारे ३८६ च्या दरात  व्यवसाय करत आहे. टाटा पॉवरटाटा पॉवरच्या शेअरमध्येसुद्धा नुकसान झाल्याचे दिसत आहे. टाटा पॉवरचा शेअर २६ डिसेंबर २०२२ पर्यंत ९ टक्क्यांहून अधिकने घसरला आहे. यावर्षी टाटा पॉवरचा ५२ आठवड्यातील उच्चांकी भाव हा २९८.०५ रुपये एवढा राहिला आहे. तर या शेअरचा ५२ आठवड्यामधील निचांकी भाव हा १९० रुपये एवढा राहिला आहे. टाटा पॉवरचा शेअर सध्या २०२ रुपयांच्या भावामध्ये व्यवसाय करत आहे.  टाटा स्टील टाटा स्टीलच्या शेअरमध्येही यावर्षी घसरण दिसून आली. टाटा स्टीलमध्ये यावर्षी २६ डिसेंबर २०२२ पर्यंत सुमारे ८ टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली आहे. या शेअरचा एनएसईवर ५२ आठवड्यांतील उच्चांकी भाव हा १३८.६७ रुपये राहिला आहे. तर ५२ आठवड्यातील निचांकी भाव ८२.७० रुपये एवढा राहिली आहे. सध्या या शेअर १०४ रुपयांच्या किमतीवर व्यवसाय करत आहे.  

टॅग्स :टाटाशेअर बाजारपैसा