Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार तीन आठवड्यांच्या उच्चांकावर

शेअर बाजार तीन आठवड्यांच्या उच्चांकावर

केंद्र सरकारचा आगामी अर्थसंकल्प वाढीला प्रोत्साहित करणारा असेल, असे वातावरण सध्या तयार झाले आहे. त्याचा लाभ बाजाराला मिळाला. याशिवाय जागतिक पातळीवरही बाजार सकारात्मक टापूत आहेत.

By admin | Published: February 19, 2015 12:23 AM2015-02-19T00:23:12+5:302015-02-19T00:23:12+5:30

केंद्र सरकारचा आगामी अर्थसंकल्प वाढीला प्रोत्साहित करणारा असेल, असे वातावरण सध्या तयार झाले आहे. त्याचा लाभ बाजाराला मिळाला. याशिवाय जागतिक पातळीवरही बाजार सकारात्मक टापूत आहेत.

The stock market is at a three-week high | शेअर बाजार तीन आठवड्यांच्या उच्चांकावर

शेअर बाजार तीन आठवड्यांच्या उच्चांकावर

मुंबई : अर्थसंकल्पाबाबत सकारात्मक वातावरण तयार झाल्यामुळे भारतीय शेअर बाजार ३ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८४.३८ अंकांनी वाढून २९,३२0.२६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५९.७५ अंकांनी वाढून ८,८६९.१0 अंकांवर बंद झाला.
केंद्र सरकारचा आगामी अर्थसंकल्प वाढीला प्रोत्साहित करणारा असेल, असे वातावरण सध्या तयार झाले आहे. त्याचा लाभ बाजाराला मिळाला. याशिवाय जागतिक पातळीवरही बाजार सकारात्मक टापूत आहेत.
बीएसई सेन्सेक्स सकाळी २९,१३६.0७ अंकांवर तेजीसह उघडला. त्यानंतर तो २९,४११.३२ अंकांपर्यंत वर चढला. सत्र अखेरीस थोडा खाली येऊन तो २९,३२0.२६ अंकांवर बंद झाला. १८४.३८ अंकांची घसघशीत वाढ त्याने मिळविली. ही वाढ 0.६३ टक्के आहे. २९ जानेवारी २0१५ रोजी सेन्सेक्स २९,६८१.७७ अंकांवर बंद झाला. त्यानंतरची ही सर्वांत मोठी उंची सेन्सेक्सने गाठली आहे.
सेन्सेक्स गेल्या ६ सत्रांपासून तेजीत आहे. या सहा दिवसांच्या काळात सेन्सेक्सने १,0९२.८४ अंक अथवा ३.८७ टक्क्यांची वाढ मिळविली आहे. सेन्सेक्समधील एचडीएफसी, टाटा पॉवर, टीसीएस, टाटा मोटर्स, एमअँडएम, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, विप्रो या कंपन्यांना तेजीचा लाभ झाला. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २0 कंपन्यांचे समभाग वाढले. हीरो मोटोकॉर्पचे भाव घसरले. याशिवाय सेसा स्टरलाईट, भारती एअरटेल, ओएनजीसी यांचे समभागही घसरले.
५0 कंपन्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ५९.७५ अंकांची अथवा 0.६८ टक्क्यांची वाढ मिळविली. निफ्टी ८,८६९.१0 अंकांवर बंद झाला.
ग्रीस आणि युरोपीय देशांत योग्य करार होण्याचे संकेत मिळत असल्यामुळे युरोपीय बाजारही तेजीत होते. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी येथील बाजार 0.१३ टक्के ते 0.८६ टक्के वाढले. आशियाई बाजारातही तेजीचा कल दिसून आला. हाँगकाँग, इंडोनेशिया, जपान आणि सिंगापूर येथील बाजार 0.१९ टक्के ते १.१८ टक्क्यांनी वाढला.


स्मॉल कॅप आणि मीड कॅप कंपन्यांचे निर्देशांक अनुक्रमे १.0४ टक्के आणि 0.८४ टक्के वाढले. बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,६३४ कंपन्यांचे समभाग वाढले. १,२८३ कंपन्यांचे समभाग घसरले.

१११ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल वाढून ४,१६२ कोटी रुपये झाली. काल ती ३,५५0.४३ कोटी होती.

Web Title: The stock market is at a three-week high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.