Join us

Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगसह उघडला बाजार, ‘या’ शेअर्समध्ये दिसली रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 09:48 IST

Stock Market Today: शेअर बाजारात कामकाजाच्या सुरुवातीला आज फ्लॅट ओपनिंग पाहायला मिळाली.

Stock Market Today: शेअर बाजारात कामकाजाच्या सुरुवातीला आज फ्लॅट ओपनिंग पाहायला मिळाली. सेन्सेक्स १४२ अंकांच्या वाढीसह ७४,४७४ वर उघडला. तर निफ्टी ३१ अंकांनी घसरून २२,५२१ वर खुला झाला. बँक निफ्टीही रेड झोनमध्ये व्यवहार करताना दिसला. बँक निफ्टी १०.१ टक्क्यांच्या घसरणीसह ४८,१०७.४५ वर खुला झाला.

सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर निफ्टी ऑटो, आयटी आणि एफएमसीजी निर्देशांकात विक्री दिसून येत आहे. तर निफ्टी मेटल, फार्मा आणि रियल्टी सेक्टरच्या निर्देशांकात मोठी वाढ दिसून येत आहे.

या शेअर्समध्ये तेजी/घसरण

कामकाजादरम्यान पॉवरग्रिड, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी आणि एचसीएलटेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर टायटन. इंडसइंड बँक, एल अँड टी, झोमॅटो, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी अमेरिकी बाजारात सुरुवातीच्या घसरणीनंतर मोठी सुधारणा झाली. डाऊ जोन्स ६२५ अंकांच्या घसरणीतून सावरत २२५ अंकांनी वधारला, तर नॅसडॅकही पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून सावरला आणि १२५ अंकांच्या वाढीसह बंद झाला. तर गिफ्ट निफ्टी ५० अंकांनी घसरून २२,६०० च्या जवळ स्थिरावला. मात्र, गेल्या आठवड्यात भारतीय बाजारातही १.८८ टक्क्यांची सुधारणा दिसून आली. या आठवड्यात बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया दिसून येत आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक