Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 378 अन् निफ्टी 126 अंकांच्या वाढीसह बंद...

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 378 अन् निफ्टी 126 अंकांच्या वाढीसह बंद...

Stock Market Today : आजच्या सत्रात बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 05:03 PM2024-08-20T17:03:48+5:302024-08-20T17:04:12+5:30

Stock Market Today : आजच्या सत्रात बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

Stock Market Today Sensex 378 and Nifty close 126 points higher | शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 378 अन् निफ्टी 126 अंकांच्या वाढीसह बंद...

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 378 अन् निफ्टी 126 अंकांच्या वाढीसह बंद...

Stock Market Closing On 20 August 2024: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मंगळवारचा दिवस(दि.20) अत्यंत शुभ ठरला. बँकिंग आणि आयटी शेअर्समधील खरेदीमुळे शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्येही वाढ दिसून आली. आजच्या सत्राच्या अखेरीस बीएसईचा सेन्सेक्स 378 अंकांच्या उसळीसह 80,902 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 126 अंकांच्या उसळीसह 24,700 अंकांवर बंद झाला.

मार्केट कॅपमध्ये 2.50 लाख कोटींची वाढ
शेअर बाजारातील या नेत्रदीपक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 456.58 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे गेल्या सत्रात 454.39 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच, आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 2.19 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 24 वाढीसह आणि 6 तोट्यासह बंद झाले. तर 50 निफ्टीपैकी 38 वाढीसह आणि 12 तोट्यासह बंद झाले. वाढणाऱ्या शेअर्समध्ये बजाज फिनसर्व्ह 3.20 टक्के, इंडसइंड बँक 2.54 टक्के, टेक महिंद्रा 2.01 टक्के, कोटक बँक 1.47 टक्के, ॲक्सिस बँक 1.12 टक्के, एनटीपीसी 1.02 टक्के, सन फार्मा 0.91 टक्के, नेस्ले 0.82 टक्के, टीईसीएल 0.82 टक्के आणि एचबीआय 0.70 टक्के आहेत, तर घसरलेल्या शेअर्समध्ये भारती एअरटेल 1.30 टक्के, आयटीसी 0.48 टक्के, अदानी पोर्ट्स 0.35 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.21 टक्के, टाटा मोटर्स 0.16 टक्के आहेत.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Stock Market Today Sensex 378 and Nifty close 126 points higher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.