Join us

शेअरबाजारात किंचित वाढ: सेन्सेक्स 81,086 अन् निफ्टी 24,823 अंकांवर बंद...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 4:22 PM

Stock Market Today : शेअरबाजारात किंचित वाढ: सेन्सेक्स 81,086 अन् निफ्टी 24,823 अंकांवर बंद...

Stock Market Closing On 23 August 2024 :शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस काहीअंशी चांगला ठरला. बऱ्याच चढ-उतारानंतर दिवसाखेर भारतीय शेअर बाजार किंचित वाढीसह बंद झाला. आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून आली, तर ऑटो शेअर्सने वाढ नोंदवली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 33 अंकांच्या उसळीसह 81,086 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 12 अंकांच्या किंचित वाढीसह 24,823 अंकांवर बंद झाला.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्सआजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स वाढीसह तर 13 तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या 50 पैकी 21 शेअर्स वाढीसह आणि 29 तोट्यासह बंद झाले. वाढणाऱ्या शेअर्समध्ये टाटा मोटर्स 1.58 टक्के, सन फार्मा 1.44 टक्के, भारती एअरटेल 1.40 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.15 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.07 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.96 टक्के, पॉवर ग्रिड 0.76 टक्के, अल्ट्राटेक सीमेंट 4.6 टक्के, एच ​​4.60 टक्के वाढीसह बंद झाले आहे. तर, टेक महिंद्रा 1.17 टक्के, एचसीएल टेक 0.93 टक्के, एशियन पेंट्स 0.86 टक्के, टायटन 0.86 टक्के, इन्फोसिस 0.74 टक्के घसरणीसह बंद झाले.

मार्केट कॅपमध्ये घसरणगेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये प्रचंड पैसा कमावल्यानंतर आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्स मार्केट कॅप 460.05 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 460.52 लाख कोटी रुपयांवर आले होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांना 47,000 कोटी रुपयांचा फटका बसला.

आजच्या व्यवहारात ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. याशिवाय ऊर्जा, इन्फ्रा आणि उपभोग शेअर्सही वाढले. तर आयटी, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स, मीडिया, रिअल इस्टेट, फार्मा, बँकिंग, एफएमसीजी शेअर्स घसरणीसह बंद झाले. 

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक