Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार घसरला; Sensex 80148 तर Nifti 24413 अंकांवर आला...

शेअर बाजार घसरला; Sensex 80148 तर Nifti 24413 अंकांवर आला...

Stock Market Today : आजच्या सत्रात आयटी, फार्मा, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, आणि ऑटो शेअर्स वधारले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 04:13 PM2024-07-24T16:13:16+5:302024-07-24T16:13:53+5:30

Stock Market Today : आजच्या सत्रात आयटी, फार्मा, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, आणि ऑटो शेअर्स वधारले.

Stock Market Today : stock market fell on the second day of the Budget; Sensex on 80148 and Nifti on 24413 | शेअर बाजार घसरला; Sensex 80148 तर Nifti 24413 अंकांवर आला...

शेअर बाजार घसरला; Sensex 80148 तर Nifti 24413 अंकांवर आला...

Stock Market Closing On 24 July 2024 : काल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता आज(24 जुलै) शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला. BSE सेन्सेक्स 280 अंकांनी घसरुन 80,148 वर आला, तर NSE निफ्टी 65 अंकांनी घसरुन 24,413 वर आला. आजच्या व्यवहारात टेक महिंद्रा 2.71 टक्के, एनटीपीसी 2.68 टक्के, टाटा मोटर्स 2.65 टक्के, सन फार्मा 1.08 टक्के, पॉवर ग्रीड 0.94 टक्के, एशियन पेंट्स 0.51 टक्के वाढीसह बंद झाले. तर बजाज फिनसर्व्ह 2.43 टक्के, बजाज फायनान्स 1.81 टक्के, एचयूएल 1.80 टक्के, अदानी पोर्ट्स 1.58 टक्के घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण होऊनही मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या वाढीमुळे शेअर बाजाराचे बाजार भांडवल वाढीसह बंद झाले. बीएसईवर लिस्टेड एकूण शेअर्सचे बाजार भांडवल 449.67 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 446.80 लाख कोटींवर आले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.87 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

सेक्टरॉल अपडेट
आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी, फार्मा, मीडिया, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, रिअल इस्टेट आणि ऑटो शेअर्स वाढीसह बंद झाले. तर बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 587 अंकांच्या उसळीसह 56,872 अंकांवर बंद झाला, तर निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 323 अंकांच्या उसळीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 12 वाढीसह आणि 18 तोट्यासह बंद झाले.

(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारीच मदत घ्या. )

Web Title: Stock Market Today : stock market fell on the second day of the Budget; Sensex on 80148 and Nifti on 24413

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.