Stock Market Closing On 14 August 2024: दोन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी(दि.14) भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आयटी शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात ही वाढ दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 150 अंकांच्या उसळीसह 79,106 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 4.75 अंकांच्या किंचित वाढीसह 24,143 अंकांवर बंद झाला.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्ससेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 वाढीसह आणि 15 तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 23 वाढीसह आणि 27 तोट्यासह बंद झाले. वाढणाऱ्या शेअर्समध्ये टीसीएस 2.30 टक्के, एचसीएल टेक 2.09 टक्के, टेक महिंद्रा 1.41 टक्के, इन्फोसिस 1.28 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.02 टक्के, भारती एअरटेल 0.85 टक्के, टाटा मोटर्स 0.80 टक्के, एसबीआय 0.65 टक्के, आयटीसी 0.75 टक्के, आयटीसी 0.75 टक्के, NTPC 0.29 टक्के आणि HDFC बँक 0.27 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर अल्ट्राटेक सिमेंट 2.46 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 1.85 टक्के, टाटा स्टील 1.81 टक्के, अदानी पोर्ट्स 1.48 टक्के, पॉवर ग्रिड 0.97 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.82 टक्के घसरले.
मार्केट कॅपमध्ये घसरणआजच्या व्यवहारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ झाली असली तरी, मिड कॅप-स्मॉल कॅपमुळे मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 72,000 कोटी रुपयांनी घसरुन 444.58 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 445.30 लाख कोटी रुपये होते.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)