Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर मार्केटचे व्यवहार आणि कराचे गणित

शेअर मार्केटचे व्यवहार आणि कराचे गणित

खरेदी मूल्याहून विकले कमी किमतीला... असं असेल तर ते नुकसान आहे. इतर एलटीसीजीसमोर ते ॲडजस्ट करता  येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 11:02 AM2023-06-19T11:02:09+5:302023-06-19T11:03:39+5:30

खरेदी मूल्याहून विकले कमी किमतीला... असं असेल तर ते नुकसान आहे. इतर एलटीसीजीसमोर ते ॲडजस्ट करता  येईल.

Stock Market Transactions and Tax Mathematics | शेअर मार्केटचे व्यवहार आणि कराचे गणित

शेअर मार्केटचे व्यवहार आणि कराचे गणित

- अजित जोशी
(चार्टर्ड अकाउंटंट)

प्रश्न : मी गेल्या काही वर्षात शेअर ट्रेडिंग करते आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये मी माझे काही जुने आणि त्या वर्षात घेतलेले शेअरही विकले. यावर कर कसा द्यावा लागेल?
उत्तर : शेअर्सवर होणारा नफा-तोटा भांडवली उत्पन्न या वर्गातील उत्पन्नात येतो. तसा तो धंद्यातलं उत्पन्न या वर्गातही येऊ शकतो. पण सहसा सामान्य नोकरदारांसाठी हे उत्पन्न भांडवली वर्गातच धरलं जातं. यात पहिला प्रश्न म्हणजे विकलेले शेअर्स किती काळ तुमच्या मालकीचे होते. म्हणजे ते तुम्ही घेऊन जर एका वर्षांहून कमी काळात विकले, तर तो अल्पकालीन भांडवली नफा म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मानला जाईल (इथून पुढे एसटीसीजी) त्यावर सेसपूर्वी थेट १५ टक्के कर लागतो, अर्थात तुमची करमुक्त उत्पन्न मर्यादा लक्षात घेऊन.
गुंतागुंत सुरू होते ती जर हे शेअर्स विकत घेतल्यापासून एका वर्षाहून अधिक काळाने विकले, म्हणजे दीर्घकालीन नफा असेल तर. अशा वेळेला पहिला प्रश्न म्हणजे हे शेअर्स ३१ जानेवारी २०१८च्या नंतर घेतले होते का? तसं असेल तर सरळ खरेदी-विक्री मूल्यातला नफा काढा, तो असेल एलटीसीजी म्हणजे दीर्घकालीन भांडवली नफा. 
मात्र १ फेब्रुवारी २०१८ मांडलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी प्रदीर्घ काळाने परत एलटीसीजीवर कर आणला, जे उत्पन्न पूर्वी करमुक्त होतं. अशा वेळेला जर शेअर्स त्यापूर्वी घेतले असतील तर करदात्याची गैरसोय नको म्हणून ३१ जानेवारी २०१८ ची किंमतही या समीकरणात आणली गेली, ज्याला ‘ग्रँडफादर क्लॉज’ म्हणतात. त्यामुळे शेअर्स जर त्यापूर्वी घेतले असतील तर तीन शक्यता आहेत.

1) खरेदी मूल्याहून विकले कमी किमतीला... असं असेल तर ते नुकसान आहे. इतर एलटीसीजीसमोर ते ॲडजस्ट करता 
येईल.

2) खरेदी मूल्याहून अधिक किमतीला विकले... अशा वेळी जर विक्री मूल्य ३१ जानेवारी २०१८च्या किमतीहून जास्त असेल, तर विक्रीवजा जानेवारी ३१ची किंमत हा एलटीसीजी पकडला जातो.

3) मात्र विक्रीची किंमत खरेदीहून जास्त; पण जानेवारी ३१च्या किमतीहून कमी असेल तर ना नफा ना तोटा, अर्थात शून्य एलटीसीजी धरतात. अशाप्रकारे हिशेब केलेल्या एलटीसीजीमधून एक लाख रुपये वजा करून उरलेल्या रकमेवर १० टक्के कर लावण्यात येतो. या सगळ्या हिशेबात एक छोटा व्यवहार कर (एसटीटी) लावला जातो, तो उत्पन्नाचा हिशोब करताना धरू नये!

Web Title: Stock Market Transactions and Tax Mathematics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर