Join us  

Stock Market : लाखाचे दोन कोटी! तीन रुपये किमतीच्या या शेअरने गुंतवणुकदारांना केलं मालामाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 5:41 PM

Penny Stock Return: ज्या कंपन्यांचा व्यवसाय मजबूत असतो. त्यांच्यामध्ये बाजाराच्या दबावामुळे स्टॉक्समध्ये करेक्शन झाले. तरी तुम्ही अशा कंपन्यांमध्ये दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक कायम ठेवली तर तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात. असाच एक स्टॉक्स आहे जीआरएम ओव्हरसीस कंपनीचा

मुंबई - शेअर बाजारामध्ये चढ-उतारादरम्यान काही असे स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांना चांगले रिटर्न दिले आहे. कारण अशा कंपन्यांचा व्यवसाय उत्तम असतो. तसेच त्यांची बॅलन्श शिट मजबूत असते. केवळ गुंतवणुकीच्या आधी अशा फंडामेंटली कंपन्यांना निवडण्याची आवश्यकता आहे. ज्या कंपन्यांचा व्यवसाय मजबूत असतो. त्यांच्यामध्ये बाजाराच्या दबावामुळे स्टॉक्समध्ये करेक्शन झाले. तरी तुम्ही अशा कंपन्यांमध्ये दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक कायम ठेवली तर तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात. असाच एक स्टॉक्स आहे जीआरएम ओव्हरसीस कंपनीचा. 

गेल्या काही वर्षांमध्ये हा स्टॉक मल्टिबेगर स्टॉक ठरला आहे. जर व्यवसायाचा विचार केला तर जीआरएम ओव्हरसिस कंपनी अॅग्रो प्रोसेसिंग सेक्टरमध्ये सक्रिय आहे. विशेषकरून ही कंपनी राइस मिलिंग व्यवसायाशी संबंधित आहे. जीआरएम ओव्हरसिसच्या शेअरची किंमत सहा वर्षांपूर्वी केवळ ३ रुपये होती. ती आता वाढून तब्बल ५९३ रुपये झाली आहे. यादरम्यान स्टॉकमध्ये सुमारे २०० पटीनी वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र गेल्या एक महिन्यापासून बाजारामधील दबावामुळे हा शेअर सुमीरे १७ टक्क्यांनी घटला आहे. मात्र तरीही हा शेअर सुमारे ७७० टक्क्यांनी वाढला आहे.

आकडेवारीनुसार जर कुठल्याही गुंतवणुकदाराने या मल्टिबॅगर स्टॉकमध्ये सहा वर्षांपूर्वी केवळ एक लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असेल तर आज ती रक्कम वाढून २ कोटी रुपये झाली आहे. कारण गेल्या ६ वर्षांमध्ये जीआरएम ओव्हरसीसच्या स्टॉकमध्ये सुमारे १९ हजार ९०० पटींनी वाढ दिसून आली आहे.

जर कुणी केवळ एक वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील. तर त्याची किंमत वाढून आज ८.७० लाख एवढी झाली आहे. केवळ सहा महिन्यांपूर्वी यामध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर ते वाढून आज तीन लाख रुपयांपर्यंत पोहोचले असते. एवढेच नाही तर जीआरएम ओव्हरसिस स्टॉकचा ५२ आठवड्यांतील उच्चांक ९३५.४० रुपये आहे. तो जानेवारी २०२२ मध्ये दिसला होता. तर या स्टॉकचा वर्षभरातील निचांक ६६.८० टक्के राहिला होता.  

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा